अन….दर्ग्याची मजार हलू लागली….

20

🔹तातारशाह बाबा दर्गाह येथील घटना

✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(त .11जुलै):-तातारशाह बाबा दर्ग्याची मजार अचानक हलत असल्याचा अनुभव उमरखेड वासियांना काल शनिवारी सकाळी आला. शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेली तातारशाह बाबा दर्गा ही आजूबाजूच्या परिसरातील प्रसिद्ध दर्गा असुन उमरखेड शहरातील सर्वधर्मीय जागृत देवस्थान आहे.
काल दिनांक 10 जुलै शनिवार रोजी सकाळी अचानक मजार हलत असल्याचे उपस्थित भाविकांनी बघताच ही गोष्ट वाऱ्या सारखी शहरात व आजूबाजूच्या परिसरात पसरली.बघता बघता हजारोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी जमा झाला.मजार प्रत्यक्षात हलतांनी बघण्यासाठी जमलेल्या लोकांना पांगविण्यासाठी शेवटी पोलिसांना पाचारण कराव लागलं.

पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून दर्ग्याचे दोनही गेट बंद केले व बाहेर जमलेला लोकांना आप आपल्या घरी जाण्याचे आवाहन मौलवी तर्फे करण्यात आले. तगड्या बंदोबस्तामुळे आठवडी बाजार परिसरात छावणीचे स्वरूप आले होते. सध्या दर्गाह मध्ये कुठल्याच हालचाली नसून दर्गाह नेहमी प्रमाणे दर्शनासाठी सुरु करण्यात आलेली आहे.

मौलवींचे म्हणणे काय?
काजी पुरा येथील मदिना मस्जिद चे इमाम अहमद रजा यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, मजार हलणे ही पहिलीच घटना नसून या आधी दीड- दोन वर्षा पूर्वी सुद्धा अकोला आणि इतर परिसरात मजार हलण्याचे प्रकार घडलेले आहेत. दीड-दोन वर्षा आगोदर मजारी हलत असल्यामुळे कोरोना चा प्रकोप सुरु झाला होता तर कालच्या या घटनेमुळे कोरोना संपला असल्याचा संदेश असण्याची शक्यता असू शकते तसेच माणसाने वाईट सवयी पासून, दुष्कर्मा पासून दूर रहावे, शुद्ध आचरण ठेवावे हा संदेश सुद्धा यातून असू शकतो असे त्यांनी सांगितले.
घटना घडल्यावर भक्तांमध्ये दर्गाह ची मजार का हलत आहे यावर तर्क वितर्क लावले जात होते. अफवांचा बाजार उठला होता.

भक्तांच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे आणि सर्वसामान्यांना या मागील कारण समजावे यासाठी काजी पुऱ्याच्या मदिना मस्जिद चे इमाम अहमद रजा यांनी याबाबत खुलासा करण्यासाठी एक विडिओ प्रसिद्ध केला आहे .
उमरखेड पत्रकार संघाची दर्गाह ला भेट
दर्गाह मधील मजार हलत असल्याचे कळताच आज सकाळी उमरखेड पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी दर्गाह मध्ये जाऊन तेथील मुजावर कडून अधिकृत माहिती जाणून घेतली यावेळी संघांचे अध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
अन त्याच दिवशी जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के….
यवतमाळ जिल्ह्यात व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के शनिवारी जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे भूकंप जाणवला नाही.
दर्गाह येथील मजार हलणे आणि भूकंप होणे या दोन्ही गोष्टींचा काही संबंध तर नाही ना असे बुद्धिवाद्यांकडून बोलले जात आहे.