महिला काँग्रेस कडून महागाई च्या विरोधात ‘आभार आंदोलना’ चे आयोजन

22

🔸महिलांनी औक्षण करून फुल देऊन पेट्रोल पंप वरील नागरिकांचे मानले आभार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि12जुलै):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात ८ ते १७ जुलै पर्यँत केंद्र सरकारने लादलेल्या महागाई विरोधात आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महिला काँग्रेस चे देखील आंदोलने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हापरिषद समोरील पेट्रोल पंप वर ‘आभार आंदोलन’ आयोजित करण्यात आले.

सतत पेट्रोल आणि डिझेल मध्ये दर वाढ करून केंद्र सरकारने सामान्य माणसाचे जगणे कठीण केले आहे पेट्रोल आज १०६ रूपये लिटर तर डिझेल ९७ रुपये लिटर विकल्या जात आहे आणि सामान्य माणसाला ते घेण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे अशा त्रस्त नागरीकांचे आभार मानण्या साठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. उपस्थित महिला पदाधिकर्यांनी पेट्रोल पंप वर येणाऱ्या नागरीकांचे औक्षण करून त्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे आभार मानले त्याच सोबत त्यांचे अभिनंदन केले. या आंदोनासोबतच महिला काँग्रेस कडून महागाई च्या विरोधात नागरिकांच्या स्वाक्षरी अभियानाची सुरवात करण्यात आली. येत्या १७ तारखेपर्यंत संपूर्ण शहरात हे साक्षरी अभियान राबावण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली.

या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, अनुसूचित विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनु दहेगावकर, जिल्हाउपाध्यक्षा सुनीता धोटे, जिल्हाउपाध्यक्षा हर्षा चांदेकर, ब्लॉक अध्यक्षा शितल काटकर, उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, सदस्य लता बारापात्रे, अनुसूचित च्या महिला शहर अध्यक्षा शालिनी भगत,माजी नगरसेविका वंदना भागवत, मुन्नी मुमताज शेख, चंदा वैरागडे, पायल दुर्गे, कविता मेश्राम, सबिया पठाण, संगीता बोरकर, अनिता दातार, डेझी सोंडूले, पार्वती चिवाल, पायल खांडेकर, श्रद्धा बावणे, कविता बोरकर यांची उपस्थिती होती.