उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांना उद्योकरत्न पुरस्कार घोषित

31

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.13जुलै):-महाराष्ट्र राज्य औद्योगिषक विकास परिषद पुणे यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा *भारत रत्न जेआरटी टाटा उद्योगरत्न पुरस्कार* यावर्षीचा व्हीपीके व एमव्हीके उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरूजी यांना मिळणार आहे.सदर पुरस्कार १८ जुर्ले रविवारी रोजी आकरा वाजता मालपाणी लाॅन्स काॅलेज रोड संगमेश्वर जिल्हा अहमदनगर येथे राज्याचे महसुल मंञी नामदार.मा.श्री.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मालपाणी उद्योग समुहाचे चेअरमन गिरिष मालपाणी ,प्रमुख पाहुणे आ.सुधीर तांबे,व्यवस्थापक समाजविका टाटा मोटर्स मा.सुशिलकुमार राणे आधी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुदाम मोरे,कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रशिधी पञका द्रवारे माहिती दिले.

कवळे गुरूजी यांना हा पुरस्कार मिळाल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी ना.श्री. अशोकराव चव्हाण,माजी मंञी डि.पी.सावंत,आ.अमरनाथ राजुरकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर,आ.मोहनराव पाटील हबंर्डे, माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बॅकेचे चेअरमन वसंतराव पाटील चव्हाण, मा.आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील तिडके,व्हाईस चेअरमन कैलास दाड साहेब,जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबूलगेकर,वसमत विधानसभा आमदार राजुभैया नवघरे आदींनी शुभेच्छा दिल्या.