नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज तर मदतीसाठी डायल -११२ कार्यान्वीत होणार

20

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)मो:-९९६०७४८६८२

नांदेड(दि.१३जुलै):-जिल्ह्यात भविष्यात अचानक उद्धभवलेल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. नैसर्गीक संकटावर मात करण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलिस दलातील पाचशेहून अधिक पोलिस प्रशिक्षण घेत आहेत. येणाऱ्या काळात ही टीम पुर्ण यंत्रणेसह सज्ज राहणार अशून नागरिकांसाठी डायल- ११२ हा क्रमांक उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.

पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या करिता महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पोंडअर सर्विसेस अंतर्गत (MERS)डायल-११२ चे प्रशिक्षण महिंद्रा डिफेन्स सिस्टम लिमिटेड महिंद्रा यांच्याकडून सहा दिवसाचे प्रात्यक्षिक व पायाभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने आठ जून ते ता. ३१ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे.एका प्रशिक्षण तुकडीत ८० अंमलदार असून एका तुकडीचे प्रशिक्षण सतत सहा दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान चालणार आहे. ५२० अंमलदार यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजित असून अद्याप पावेतो २५६ अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण हे जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिस सेवा एकाच टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध करुन देण्याचे अनुषंगाने नांदेड पोलिस दलात डायल क्रमांक -११२ कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

तसेच नांदेड पोलिस दलासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने पंचेचाळीस चार चाकी वाहने व ७६ दुचाकी उपलब्ध होणार आहेत. दोन चाकी व चार चाकी वाहने रात्र गस्त, दरोडा पेट्रोलिंग यादरम्यान वाहन निश्चित कोणत्या ठिकाणी आहे जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून समजणार आहे. सदर प्रशिक्षण घेण्याचा उद्देश म्हणजे पोलिस दलाकडून जनतेकरिता तात्काळ सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून घेण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, पोलिस उपाधीक्षक ( गृह ) विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्नेहा पिंपरखेडे यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.