ऑनलाईन पेपर विद्यापीठाने सुरळीत घ्यावेत अन्यथा छावा स्टाईल आंदोलन करण्यात येईल- बालाजी पाटील धनंजकर

20

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.13जुलै):- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा चालु आहेत, यामध्ये BSC तृतीय वर्ष ची परीक्षा चालु आहे यात दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत केमिस्ट्री या विषयाचा पेपर घेण्यात आला.

सदर विषयाचा पेपर सुरू असताना लॉग इन झाल्यावर नेटवर्क च्या समस्येमुळे व सिस्टम वर आलेल्या लोड मुळे 25 ते 30 टक्के विद्यार्थी बाहेर फेकले (एंट्री केली की एक्झिट होत आहे) गेले व ते विध्यार्थी परीक्षे पासून वंचित राहिले आहेत.
काही ठिकाणी एकाच्या सीट नंबर वर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे निदर्शनास आले आहे. संबधित अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करून पुढील पेपर सुरळीत घेण्यात यावा किंवा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात. या मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ उध्दव भोसले यांच्या मेल वर पाठवण्यात आले, पुढे निवेदनात वरील मागण्या तात्काळ सोडवुन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान विद्यापीठाने टाळावे अन्यथा, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने विद्यापीठासमोर सामोरं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अ भा.छावा मराठा युवा संघटनेचे विद्यार्थी आघाडी चे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील धनंजकर यांनी केला आहे.
——

 या विषयी विद्यापीठ प्रशासनाशी फोनवर संवाद साधला असता जे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक नुकसान न होऊ देता त्यांचा त्या विषयाचा परत पेपर घेतला जाईल असं विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.” – बालाजी पाटिल धनंजकर