चिमुरात गुरुदेव सेवा मंडळातर्फे वृक्षारोपण

47

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.14जुलै):-अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम द्वारा सलग्नित श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमूर तर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी श्री गुरुदेव उपासक, व्यापारी वर्ग, महिला-पुरुष उपासक तसेच राष्ट्रीय प्राथमिक शाळा येथील कर्मचारीवृंद यांच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या सुशोभित फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमूरचे ग्रामसेवाधिकारी वसंतराव कडू गुरुजी, गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक प्रा. अशोक चरडे, उपग्रामसेवाधिकारी भक्तदास जिवतोडे, गटशिक्षणाधिकारी देविदास मेश्राम, कोषाध्यक्ष दिलीप राचलवार, सदस्य प्रकाशबापु बोकारे, प्रचार संघटक परमानंद बोरकर, मार्गदर्शक कृष्णा तपासे, रमेश भानारकर, मारोतराव अतकरे, रवींद्र कापसे, डॉ. अनिल भार्गव, शामराव सूर पाटील, दडमल, राजू भट, भजन प्रमुख सचिन वैद्य, ज्योतीताई भट, मंदाताई कुंटेवार, संगीताताई देवतळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमूर तर्फे विविध सामाजिक कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम, राष्ट्रीय व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. विविध उपक्रमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार व साहित्य जनसामान्यापर्यत पोहचविण्याचे कार्य मंडळ सदैव करीत असते.