गंगाखेड लॉयन्स क्लब व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने रक्तदान शिबिर

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.14जुलै):-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात व जिल्ह्यात होत असलेला रक्त तुटवडा लक्षात घेता.आज गंगाखेड येथील योगेश्वर कॉलनी गीता मंडळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे लॉयन्स क्लब,लोकमत व राष्ट्रीय सेवा योजना गंगाखेडच्या वतीने घेण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगाखेड चे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,प्रमुख पाहुणे तहसीलदार स्वरूप कंकाळ,उपविभागीय पोलिस अधीक्षक राठोड,पोलीस निरीक्षक वसुधरा बोरगावकर,डॉ. केशव मुंडे, डॉ,देविदास चव्हाण, लॉ. केशव देशमुख कॅबिनेट ऑफिसर,लॉयन्स क्लब अध्यक्ष अतुल गंजेवार, प्रा.प्रकाश सुर्वे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख,श्रीकांत भोसले, लॉयन्स क्लब चे सर्व

सन्माननिय सद्स्य आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी 49 रक्त दात्यांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीव्यापारी महासंघ, बजरंगदल,माजी सैनिक,नाभीक महासंघ,होमगार्ड संघटना,गुमस्ता महासंघ,हमाल मापाडी संघ,यांचे पदाधिकारी, लॉयन्स क्लबचे दगडूशेठ सोमाणी,सोन्नर सर,बालाजी ढाकणे,वाडेवालेसर,ज्ञानेश्वर कापसे,आदिनाथ मुंढे,चिणके सर,ज्ञानेश्वर राजूरकर, रामेश्वर तापडिया,संजय तापडिया, गोविंदराज रोडे,महादेव गित्ते,डॉ.सोनवणे सर, अभिनय नळदकर,भगत सुरवसे,जगन्नाथ आंधळे,मोहन गित्ते,लोकमतचे अन्वर लिबेकर, अनिल शेटे,बजरंग दलचे संजय लाला अनावडे, नाभिकचे बालासाहेब पारवे,बालाजी महाजन,आदींनी सहकार्य केले.