शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे व 85 गावांचा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून समावेश करण्यात यावा-ना. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री यांचे स्पष्ट निर्देश

18

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.14जुलै):- शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे व 85 गावांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी संदीप दादा बेडसे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी उपमुख्यमंत्री माननीय ना. अजित दादा पवार, मा.ना. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री, तसेच मा.ना.संजय बनसोडे राज्यमंत्री,पाणीपुरवठा व स्वच्छता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिंदखेडा तालुक्यातील यासह अशी गाव पाणीपुरवठा योजनेबाबत व सदरील गावांमधील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे करिता जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजना राबविणे बाबत विस्तृतपणे चर्चा केली.

शिंदखेडा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून बऱ्याच गावांना पाणीपुरवठ्याची निश्चित व कायम स्वरूपी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. बऱ्याच गावांना टँकरद्वारे बारमाही पाणी पुरवठा करावा लागतो. दुथडी भरुन वाहणारी तापी नदी जरी शिंदखेडा तालुक्यातून जात असली तरी वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्ष अभावी तालुक्यातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत.

तापी नदीवरील सारंखेडा व सुलवाडे बेरीज मधून शाष्वत पिण्याचा पाणीपुरवठा चिमठाणे, अजंदे (खु) ,अलाने, अमराळे, अंजनविहीरे,अरावे,बाभुळदे, भडणे, चांदगड ,चौगाव (बु),चौगाव(खु),दलवाडे(प्रस), पिंपरी,चिमठावळ,चिरणे, डाबली, दलवाडे (प्रन),डांगुर्णे,सोंडले,दराणे, दरखेडा,दसवेल,दत्ताणे,देगाव देवी,धांदरणे,धावडे,गव्हाणे,शिराळे,गोराणे, हतनुर, होळ(प्रबे),जखाणे,जातोडे,जोगशेलु,कदाणे, कलमाडी,कामपुर,वरूळ, वरझडी,विखरण,विखुर्ले, विटाई,कंचनपुर,कर्ले,देवकानगर,खलाणे,खर्दे(बु),महालपुर,माळीच,मालपुर, मांडळ,मेलाणे,मेथी,मुक्टी, निरगुडी,निशाणे,कुमरेज,परसामळ,परसोळे,पथारे,पिंपरखेडा,पिंप्राड,रहिमपुरे,रामी,रेवाडी,रोहाणे,साळवे,सार्वे,सतारे,शेवाडे,सोनशेलु, अक्कलकोस,चुडाणे, कलवाडे,सुराय,तामथरे, टेंभलाय,वाघोदे,वायपुर,घुसरे, वाघाडी (बु),बाभळे, वाघाडी (खु),हिरवे,वाडी अशा एकूण गावांना जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून कायमस्वरूपी लाभ मिळेल व या योजनेस साधारण २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे असे संदीप दादा बेडसे यांनी निदर्शनास आणून दिले.

सदरील सर्व परिस्थितीचा विचार करता शिंदखेडा तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी माननीय नामदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री तसेच माननीय नामदार संजय जी बनसोडे राज्यमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता यांनी सदरील योजना कार्यान्वित होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासित केले तशा स्पष्ट सूचना माननीय प्रधान सचिव,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांना दिल्यात.