उमरखेड काँग्रेस तर्फे वाढत्या महागाईमुळे केंद्रातील हुकूमशाही

19

🔸भाजप सरकारच्या विरोधात काढला भव्य सायकल मोर्चा

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.15जुलै):-केंद्रातील भाजपा सरकारच्या काळामध्ये मागील सात वर्षांपासून पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत,आता तर उच्चांक गाठला आहे.पेट्रोल-डिझेल 106 रुपये प्रति लिटर च्या वर गेलेल आहे,तर खाद्यतेल दोनशे रुपये लिटर च्या वर गेलेल आहे, इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. अशी गगनचुंबी भाववाढ काँग्रेसच्या काळामध्ये कधीही झालेली नव्हती परंतु केंद्रातील भाजपच्या सरकार कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन सामान्य जनतेवर होणारा अत्याचार उघड्या डोळ्या ने बघन्या शिवाय काहीच करायला तयार नाही. त्याच्या विरोधात संपूर्ण भारतभर अनेक आंदोलने चालू आहेत, शेतकरी आंदोलने चालू आहे, परंतु कुठल्याही आंदोलनाला हुकूमशाही सरकार न्याय द्यायला तयार नसून कोणत्याही प्रकारच्या किमती कमी करायला तयार नाहीत.

अशा या कुंभकर्णी निद्रेत असलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज दि14/7/2021 बुधवारी रोजी भव्य सायकल मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्च्या मध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व सामान्य नागरिकांना आवर्जून भाग घेऊन केंद्रातील भाजप सरकारचं विरोधात घोषणा देत आपला विरोध नोंदवला तसेच काँग्रेस पक्षा तर्फे पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल,इत्यादी जीवनावश्यक वस्तूच्या वाढलेल्या किमती हुकूमशाही सरकारने तात्काळ मागे घ्यावे असे आव्हावन करण्यात आले.

या मोर्च्या समयी माजी जी प बांधकाम सभापती तातुभाऊ देशमुख,तालुका अध्यक्ष दतरावजी शिंदे,जि प बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर,गोपालभाऊ अग्रवाल,कृ उ बा समिती सभापती बाळासाहेब चंद्रै ,डॉ कदम जिनप्रेस,प्रेमराव वानखेडे,कल्याणराव माने, बाबूभाई हिना,युवक काँग्रेस अध्यक्ष इम्रान पठाण,प्रभाकर लाहेवार, दुर्गमवार अण्णा, बाळू भट्टड, संदीप हिंगमीरे, सोनू खतीब, तालिब भाई, गजानन रासकर, राहुल काळबांडे, भैय्या पवार,युवराज, युवराज देवसरकर, शिवाजी वानखेडे,दर्शन भंडारी,निरंजन चव्हाण, नवल काळोसे, अमोल पतंगराव, सुरज शिंदे, किशोर तिवारी, विरेंद्र खंदारे, विक्की गिरी, अनिल शेरे,अनवर ,मधुकर फिटिंग, प्रभाकर कदम इत्यादी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.