नूतन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पदभार स्विकारला

21

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.१५जुलै):-जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज त्यांच्याकडे जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे सुपूर्त केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाडवे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन घुगे, सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, संदीप चिंचोले, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेराणिया तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

सुरुवातीला मावळते जिल्हाधिकारी पापळकर यांनी श्रीमती अरोरा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदनंतर पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांचा परिचय करुन देण्यात आला. नंतर मावळते जिल्हाधिकारी पापळकर यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.