2 ऑगस्ट रोजी आजाद समाज पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित

24

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15जुलै):-संविधान रक्षक, कर्मयोद्धा, बहुजनचा बुलंद आवाज भीम आर्मी संस्थापक तथा आजाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.भाई चंद्रशेखर आजादजी यांच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आजाद समाज पार्टी च्या भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दि.०२/०८/२०२१ रोजी दुपारी २ वाजता पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे.

या मेळाव्याला आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पॅंथर मा.राहुलदादा प्रधान हे मार्गदर्शन करणार आहेत.व प्रमुख उपस्थिती म्हणून आजाद समाज पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव मा.मानिषभाऊ साठे उपस्थित राहतील.

या मेळाव्यात नवीन पदाधिकार्याचा पदग्रहन सोहळा,कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात येईल.या मेळाव्याला जिल्हातील सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे असे आवाहन आजाद समाज पार्टी चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी केले आहे.