चांदवडला लसीकरणात सोशल डिस्टनसिंग चा फज्जा, चांदवडला कोरोना संपला की काय?नागरिकांमध्ये चर्चेला उधाण

    38

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

    नाशिक(दि.16जुलै):-चांदवड शहरातील उपजिल्हा रुग्णालय इमारतीत कोविड लसीकरण केंद्र सुरू आहे.सदरचे केंद्र जनता विद्यालयात असताना जागा भरपूर उपलब्ध होती मात्र आता कमी जागेत खूप जास्त नागरिक रांगेत लसीकरणासाठी उभे असल्याचे चित्र आज दिसले.सदरील गर्दीवरून साहजिकच चांदवड मधील कोरोना संपला की काय?असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.

    दोन पोलीस कर्मचारी सदरील गर्दी नियंत्रणात आणनेसाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत होते. चादंवङ शहरात फक्त 100 डोस उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात होते त्यामुळे मला लस मिळेल की नाही यासाठी नागरिक ताटकळत उभे होते.तसेच काही नागरिकांनी शहरातील पत्रकारांना फोन करून याबाबत सांगितले व पत्रकार तेथे गेले असताना पोलीस कर्मचारी यांनी “तुमचे येथे काय आहे,चला इथून,नाहीतर आम्ही निघून जातो”अशाही भाषेत वक्तव्य केले.यावरून पोलीस व नागरिक पत्रकार यांच्यातील समन्वय चांगल्याच प्रकारे दिसून आला