चंद्रपूर जिल्ह्यात (दि.16जुलै) रोजी 23 कोरोनामुक्त, 17 कोरोना पॉझिटिव्ह

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.16जुलै):- गत 24 तासात जिल्ह्यात 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 17 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 17 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 9, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 1, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 899 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 224 झाली आहे. सध्या 142 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 89 हजार 833 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 1 हजार 946 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1533 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 11 कोरोनामुक्त, तर 7 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.16जुलै):- आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30487 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29619 वर पोहचली. तसेच सद्या 127 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 741 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.15 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.42 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

नवीन 7 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 02, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 11 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 02, अहेरी 02, आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 03, धानोरा 01, एटापल्ली 00, मुलचेरा 00, सिरोंचा 02, कोरची 01, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.