भारतीय बौद्ध महासभा दिग्रसने केले वृक्षारोपण

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

दिग्रस(दि.17जुलै):- भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस महिला विभागाच्या उपाध्यक्षा आय.उज्वला महिंद्र मानकर यांच्या सौजन्याने यांचे वडील स्मृतिशेष डॉ आनंदराव कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि.१६ जुन रोजी शुक्रवारला भारतनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रसचे अध्यक्ष विनायक देवतळे, प्रा .मधुकर वाघमारे, प्रा .त्रिपाल राहूलगडे, प्रा .मोरेश्वर उईके, प्रा .नरेंद्र फुलझेले, मधुकर वाघमारे, रजनीताई उईके, कल्पना राहूलगडे, उषा वाघमारे, इंदूबाई कोरवते, इंगोले बाई, संकेत वाघमारे अभिजीत देवतळे, हिमांशू राहूलगडे,दिक्षांत फुलझेले,हर्षल उईके, कुणाल ठकणे इत्यादी उपस्थित होते