विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. किस्किंदाताई पांचाळ यांचे शिवानंद पांचाळ नायगांवकर केले स्वागत

26

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.१८जुलै):-किस्किंदाताई पांचाळ ह्या नांदेड दौऱ्यावर आल्या आसता, शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी केले , त्यांचा सत्कार किस्किंदाताई पांचाळ यांनी कोरोना महामारीत स्वत:च्या जिवाची कुठलीही परवा न करता , या महामारीच्या काळात स्वताच्या अंगावरील दागिने गहान ठेऊन सलग 20 दिवस दररोज स्वतःच्या हाताने जेवण तयार करून बीड शहरातील तीनशे ते साडेतीनशे गरजू लोकांना जेवनाचे डबे स्वतः पुरवत होत्या, त्यांच्या या उल्लेखनीय महान जनसेवा कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे, त्यांच्या या जनसेवा कार्याला मदत व्हावी , किस्किंदाताई करत असलेल्या निस्वार्थ जमसेवेला आपलाही हातभार लागावा या भावनेतून शहरातील काही सामाजिक बांधिलकी असलेले युवक मंडळींनी सहकार्य केले.

महिला जरी जेवण तयार करून देत असल्या तरी जेवणाचे डबे भरून भुकेलेल्या लोकांपर्यंत पोहोच करण्याचे काम युवक मंडळी करत होते, दररोज 20 ते 25 लोक हे सेवाभाव म्हणून काम करत होते. तर काही तुटपुंज्या पगारावर काम करत होते, अंगावरचे दागिने गहाण ठेवून या उपक्रमास सुरुवात केली होती, नेहमीच समाज कार्यासाठी किंस्किदाकाई तत्पर असतात , विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात, सौ. किंस्किंदाताई नांदेड दौऱ्यावर आलेल्या असल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद पांचाळ, यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या जनसेवा कार्यास शुभेच्छा देवून त्यांचा सत्कार ही करण्यात आला. विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी सौ.सुरेखाताई पांचाळ नांदेड यांच्या घरी सदर कार्यक्रम पार पडला,