अत्याचार होऊनही पिडित तरुणीची दखल न घेता तिच्या शब्दात तक्रार न घेता चुकिची फिर्याद घेणाऱ्या तीनही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा अन्यथा उपोषण करु.- प्रा.शिवराज बांगर

95

🔸कोरोणा काळामध्ये काम करणाऱ्या नर्सवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता असलेल्या नराधमाने केला अत्याचार

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.19जुलै):-बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोरोणा काळामध्ये काम करणाऱ्या नर्सवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता असलेल्या नराधमाने अत्याचार केला.या अत्याचाराची फिर्याद घेऊन सदर तरुणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गेली असता तिला जातिवाचक शिवीगाळ करत तिची बलात्काराची फिर्याद न घेता PI ठोंबरे यांनी केवळ शिविगाळ केल्याची NC नोंद करायला सांगितली …त्या NC बाबतची माहिती मेकले नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याने वाळु माफिया आसलेल्या आरोपीस पुरवली, त्या माहितीनुसार तो आरोपी सदरील मुलीच्या घरी आला व मोठमोठ्याने दरवाजा वाजवु लागला तेव्हा ती मुलगी मदतीसाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला वारंवार कॉल करत होती. परंतु तिची कुणीही मदत केली नही. आरोपीने तिला जबरदस्तीने गाडीवरती टाकून पाडळसिंगी टोल नाका नजीक जीवे मारण्याच्या उद्देशाने अपघात घडून आणला.

त्यात ती तरुणी गंभीर रित्या जखमी झाली पाच दिवस रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना कोणीही तिची फिर्याद घेण्यास गेले नाही.शेवटी वंचित बहुजन आघाडी ने या विषयावर आवाज उठवल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वादग्रस्त पोलीस अधिकारी psi मीना तुपे ह्या स्टेटमेंट घेण्यासाठी गेल्या असता तुम्ही “अमुक जातीचे लोक हे पैशासाठी असे धंदे करतात” आणि आमच्या जातीच्या मुलांना तुम्ही बदनाम करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली, “तो मुलगा माझा नातेवाईक आहे हे प्रकरण मिटून घे नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील.” अशा प्रकारची धमकी दिली, तसेच मुलीच्या भावाला शिवीगाळ करत मुलगी ज्या शब्दात सांगत होती त्या शब्दात फिर्याद न घेता चुकीच्या शब्दात फिर्याद घेऊन मुलीला जबरदस्ती त्या फिर्यादीवर सह्या करयला लावल्या.

वरिल सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वरती कारवाई करवी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हे तीनही अधिकारी व कर्मचारी निलंबित करून त्यांना सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी करावे या मागणीवर ती “वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा ठाम आहे.”

येत्या तीन दिवसात या तीनही अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना आरोपींना न केल्यास “पीडित मुलीच्या कुटुंबासह वंचित बहुजन आघाडी मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.”