अवैध दारू साठा व विक्री करणाऱ्यावर विशेष पथकाची कारवाई

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29जुलै):-दि .१८ जुलै रोजी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील विशेष पथक हद्दीत पेट्रोलींगवर असताना १२:४५ वा दरम्यान त्यांना गुप्त माहीतीदाराद्वारे खबर मिळाली. पोलीस अभिलेखावरील अवैध दारू विक्रेता संदीप उर्फ कटप्पा हीरामण गुरपुडे याने खेड ( मक्ता ) येथील तलावाजवळ अवैध देशी दारूचे बॉक्स विक्री करण्याकरीता लपवून आणून ठेवले आहे व तेथून तो इतरत्र वाहतूक करणार आहे.

अशा गुप्त खबरेवरून तात्काळ सापळा रचून खेड (मक्ता) येथील तलावाजवळ धाड टाकली असता संदीप उर्फ कटप्पा हीरामण गुरूपुडे वय २८ वर्ष रा खेड ( मक्ता ) याचे ताब्यातून रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीची देशी दारू प्रत्येकी ९ ० ml च्या एकूण ६०० बॉटल की.अं ३६,००० रू चा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला.

आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलींद शिंदे , पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक श्री आशिष बोरकर पो.हवालदार नरेश रामटेके , नाईक पो.का मुकेश गजबे , पो.का प्रमोद सावसाकळे, प्रकाश चिकराम यांनी केली .