बलात्काऱ्यांना कठोर शासन करून फासावर लटकवा-तुळशीराम वाघमारे

20

🔹प्रतिष्ठानच्या सुनीताताई नेटके,आप्पा सोनटक्के यांच्या सह पदाधिकारी यांची मागणी

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

तलवाडा(दि.20जुलै):-समाजावर वारंवार होणारे हल्ले ,अन्यात,अत्याचार , महिला ,मुलीवर होणारे बलात्कार अशा एकामाघे एक अमानवीय ,अमानुष घटना महाराष्ट्रा सह देशात घडत आहेत.याला वेळीच आळा घालणे आजच्या काळाची गरज बनली असून सडक्या मनोवृत्तीच्या मुंडक्यांना समाजाने एकत्र येऊन ठेचणे महत्वाचे आहे. अन्याय अत्याचार करणारे हात जेरबंद करून त्यांच्या पायात बेड्या घालणे आवश्यक आहे. आपल्या आई- बहिणी प्रमाणे समाजातील प्रत्येक मुली आणि महिलांच्या सरंक्षना चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.समाज सुरक्षित नाही एकापाटोपाठ एक घटना घडत असून आपण फक्त सोशल मीडियावर निषेध नोंदवत आहोत.

फक्त निषेध नोंदऊन चालणार नाही त्या साठी लढावे लागेल आणि शासन आणि प्रशासन यांना जागे करावे लागेल त्यामुळे सर्व समाजाने एकत्र येण्याची वेळ आली असून बलात्काऱ्यांना कठोर शासन करून फासावर लटकावे असे मत संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे,अध्यक्ष आप्पा सोनटक्के, प्रदेशाध्यक्ष सुनीताताई नेटके यांनी व्यक्त केले.
सुर्डी तालुका माजलगाव या ठिकाणी एका निष्पाप,अल्पवयीन मुलीवर नराधमाणे बलात्कार करून समाजाला काळिमा फासणारी घटना घडली,या घटनेचा निषेध,परंतु सरकारने असल्या सडक्या बुद्धी च्या लोकांना फासावर लटकावले पाहिजे तेव्हाच कायद्याचा धाक निर्माण होईल.

या आधी हाथरस प्रकणाने देश ढवळून निघाल्या त्यानंतर राधानगरी( कोल्हापूर) या ठिकाणी एका निष्पाप 20 वर्षीय तरुणीवर मागील महिन्यात अत्याचार करून कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेच्या विरुद्ध कोल्हापूर सह सर्व महाराष्ट्रात संतापाची लाट निर्मान झाली होती . ही घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील एका 20 वर्षीय समाज बहिणीवर अत्याचार करून तिला विष पाजले ,उपचारा दरम्यान पीडिता दगावली. एक सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी या नात्याने प्रशासनास संत रविदास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य मार्फत निवेदन देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी करण्यात आली होती. या आधी ही अनेक घटना घडल्या असून हा अन्याय ,अत्याचार कुठं पर्यंत आणि का सहन करायचा ? हा प्रश्न उपस्थित होतो.

यावर आता फक्त निषेध आणि निवेदन देऊन न्याय मिळणार नसून सरकारनेच कडक धोरण राबवणे गरजेचे आहे.अल्पवयीन मुलीवर अत्याचार ,बलात्कार झाल्यावर तात्काळ अटक आणि कार्यवाही करून आरोपीस कठोर शासन किव्हा फाशी होणे हा कायदा शासनाने पारित करण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठान चे तुळशीराम वाघमारे,आप्पा सोनटक्के, सुनीताताई नेटके, संध्याताई सोनवणे,शरदाताई वाघमारे,दुद्धेशर पांडव सर,बाळासाहेब राऊत,प्रशांत उनवणे,शेषेराव पोटे,जितेंद्र खरात,राहुल डोंगरे,प्रभू उनवणे,विकास उनवणे,यांच्यासह प्रतिष्ठान च्या पदाधिकारी यांनी मागणी केली आहे.