सकाळगांव ता.घनसावंगी येथे वृद्ध महिलेस गंभीर मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न

21

🔺घनसावंगी पोलिसांत गुन्हा नोंद

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)

साकळगांव(दि.21जुलै):- ता.घनसावंगी जि.जालना येथे वृद्ध महिलेला गंभीर मारहाण करीत संगनमताने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली.

सविस्तरपणे वृत्त असे की, तक्रारदार तुकाराम अन्शिराम (वय70वर्ष) रा.साकळगांव ता.घनासावंगी त्यांची पत्नी रुक्मिण तुकाराम गोरे (वय 65 वर्ष) शेतात एकटी काम करत असतांना त्यांचे शेजारी राहणारे आरोपी पांडूरग अंबादास माने (वय 40 वर्ष )व त्यांची पत्नी (वय 35 वर्ष),व त्याचे दोन मुले वरील सर्व राहणार साकळगांव यांनी तक्रारदार तुकाराम अन्शिराम गोरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, वरील दोघांनी त्यांच्या पत्नी रुकमीन गोरे शेतात एकटी काम करत असताना विनाकारण बांधावर येवून अत्यंत घाण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व संगनमत करून प्राणघातक हल्ला केला व जबरी मारहाण करून, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला सदरील आरोपींवर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व न्याय द्यावा व पुढील येणाऱ्या दिवसांत काही अनुचित प्रकार घडू नये यांसाठी पोलिसांनी पावले उचलावीत अशी मागणी श्री तुकाराम गोरे यांनी घनसावंगी पोलिसात केली आहे.

वरील तक्रारीनुसार घनसावंगी पोलिसांनी पावले उचलत गुन्हा रजिस्टर नंबर NCNo505/2021
कलम 323,504,506 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास पो.ना./612 कुटे हे करीत आहेत.