एक अभ्यासू व्यक्तीमत्व – मा.श्री.देवेंद्र फडणवीस

39

स्वच्छ प्रतिमा,अभ्यासू वृत्ती,कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस आहेत.नगरसेवक,सर्वात कमी वयात महापौर,आमदार,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद ते मुख्यमंत्री तसेच आता विरोधी पक्ष नेते असा यशस्वी टप्पा गाठणारे देवेंद्र फडणवीस.हे भारतीय जनता पक्षातील नेते आहेत.ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधीपक्ष नेता आहेत व फडणवीस महाराष्ट्राचे २८ वे मुख्यमंत्री होते.ते नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत.३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.त्यापूर्वी,वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.२०१९ ला सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे.

स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री अशी छबी तयार करून देखील सर्वाधिक आमदार निवडून येऊन देखील विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली.संघ,जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला.सोशल मीडियामध्ये गाजत असलेली ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा शेवटी प्रत्यक्षात अवतरली होती.
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले.त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून,व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा,अर्थ,तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथील डी.एस.ई.बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.

देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्यांच्या वडीलांची आणि काकूंची पुण्याई आहेच.पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे कष्टही महत्त्वाचे आहेत.ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्यानंतर फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.आजही विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी ते समर्थपणे पेलवत आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपुरात झाला.ते महाराष्ट्राचे २८ वे मुख्यमंत्री होते.नागपुरच्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात,९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परीषद आणि भारतीय जनता युवा मोर्चातून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.फारच थोड्या कालावधीत जनसामान्यांतील युवा नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले.नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या पदवीचे शिक्षण विशेष गुणवत्तेसह पूर्ण केले.त्यानंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली.

शहराच्या धरमपेठ परीसरात त्यांचे निवासस्थान आहे.वयाच्या २५ व्या वर्षी पहील्याच प्रयत्नात ते नागपुरचे महापौर झाले.सर्वात तरुण महापौर म्हणून तेव्हा त्यांचा गौरव झाला.विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करुन ते आमदार झाले.तेव्हा दक्षिण-पश्‍चिम हा केवळ पश्‍चिम नागपूर मतदारसंघ होता.दोन वेळा त्यांनी उत्कृष्ठ संसदपटुचा पुरस्कार पटकावला आहे.भारतीय जनता पक्षाचे ते तरुण प्रदेशाध्यक्ष होते.त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले.तरुणपणी मुख्यमंत्री झाल्याबद्दल शरद पवार यांचा आजही गौरव केला जातो.पवार यांच्यानंतर फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.आजही विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी ते समर्थपणे पेलवत आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी विरोधकांसोबतच पक्षांतर्गत विरोधकांवरही जोरदार प्रहार केले आणि भारतीय जनता पक्षाला राज्यात घवघवीत यश मिळवून दिले.अशा या उमद्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा….!!!

✒️लेखक:-राजेंद्र लाड(आष्टी,जि.बीड)मो.९४२३१७०८८५