एव्हरेस्टवीरांना नोकरी देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने शासनाकडे केली मागणी

28

🔹माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार निमकर यांच्या उपस्थित निवेदन

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.22जुलै):-मिशन शोर्य- २०१८ अंतर्गत कोरपना व जिवती या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासीबहुल तालुक्यातील ५ पंचारत्नांना शासनाने दिलेल्या अश्वासणानुसार गृह विभागात नोकऱ्या देण्यात याव्या अशी मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी माजी मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवारयांच्या नेतृत्वात शासनाकडे केली आहे. एव्हरेस्टवीरांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे त्यांना सन्मानाने जगण्यासाठी दिलेल्या अश्वासना नुसार गृह विभागाच्या वतीने येत्या काही दिवसात होणार असलेल्या मेगा पोलीस भरतीत सामावून घेण्याची विनंती शासनाकडे करण्यात आलेली आहे.

एव्हरेस्ट वीरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा सरचिटनिस नामदेव डाहुले, सुभाष कसमगोटूवार, दत्तप्रसंन्न महादाणी व एव्हरेस्टवीर कु. मनीषा धुर्वे झुलबर्डी ता. कोरपना, उमाकांत मडावी गोविंदपूर ता. कोरपना, प्रमेश आडे चिंचोली ता.कोरपना, कविदास काटमोडे सगणापूर ता. जिवती, विकास सोयाम असापूर ता. जिवती यांची उपस्थिती होती.
राज्याचे तत्कालीन अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा पालकमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तथा अथक प्रयत्नातून व तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे प्रकल्प अधिकारी डी. दयानिधी राजा यांच्या उत्कृष्ठ नियोजनातून आदिवासी विकास विभाग व जिल्हाप्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “मिशन शोर्य-२०१८या पहिल्या टप्प्यातील उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व जिवती या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील दहा पैकी पाच विद्यार्थ्यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एवरेस्ट शिखर सर केले. उणे झिरो डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानावर विद्यार्थ्यांनी चढाई करून एव्हरेस्ट शिखरावर झेंडा रोवला व देशाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या उत्तुंग कामगिरीमुळे देशासह महाराष्ट्राची, चंद्रपूर जिल्ह्याची आणि आदिवासी विकास विभागाची मान अभिमानाने उंचावली होती.
या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या विक्रमी कामगिरीबध्दल देशाचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री राजनाथ सिंह, तत्कालीन गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तत्कालीन राज्यपाल मा. विद्यासागरराव, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्तकालीन अर्थ, नियोजन व वन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, तत्कालीन आ. वि. मंत्री विष्णू सावरा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले होते. या पंचारत्न शौर्यवीरांना आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून शासनाकडून प्रत्येकी २५ लाख रु. सानुग्रह अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले होते व शिक्षण पात्रतेनुसार गृहविभागात विशेष बाब या सदराखाली नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
सुदर्शन निमकर यांचा पाठपुरावा…
आदिवासीबहुल भागातील होतकरू विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या शौर्य बद्दल सर्वांना अभिमान आहे. अतिशय हलाखीचे जीवन जगणाऱ्या कुटुंबातील एव्हरेस्ट वीरांना आर्थिक आधाराची गरज आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार या पाचही एव्हरेस्टवीर यांना नोकरीत सामावून घ्यावे यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर हे माजी पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.