बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या – नंदू भाऊ गट्टूवार

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22जुलै):-केंद्र शासनाने एक विशेष बाब म्हणून महाराष्ट्र राज्यासह भारत देशातील प्रत्येक राज्यात समग्र उच्च शिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणारी योजना कार्यान्वित करावी अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दल अध्यक्ष नंदू भाऊ गट्टूवार यांनी केली आहे.भारत देशातील प्रत्येक राज्यातील युवती, युवक हे उच्चशिक्षित झाले आहेत त्यामुळे भारतीय संविधानातील तरतुदीनुसार केंद्र शासनाने याबाबत सांगोपांग विचार विनिमय करून प्रत्येक राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे परंतु शासनाने त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

शासनाचे उद्योग स्थापन करण्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष होत असल्याने सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळत नाही. भारत देशातील विज्ञान-तंत्रज्ञानाची युगाचे सुशिक्षित बेरोजगार युवकांचे फार मोठी शोकांतिका आहे. उच्चशिक्षित सुशिक्षित बेरोजगार यूवकांना उपलब्ध करून न देणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून रोजगार अभावी सुशिक्षित बेरोजगार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. केंद्र शासनाच्या अनास्थेमुळे हातबर हताश व वैफल्य ग्रस्त झाले आहेत, एवढेच नव्हे तर ते अशा भयावह परिस्थितीच्या चक्रव्यूहात सापडून मार्गाचा अवलंब करून आपले लाखमोलाचे जीवन उद्ध्वस्त करत असल्याने याचा विपरीत परिणाम समाज व देशाला वरही होत असतो.

देशात व त्या प्रत्येक राज्यात उद्योगधंदे स्थापन झाले तरच उच्चशिक्षित सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल व त्यांना आर्थिक स्थैर्य लाभून जीवनमान उंचावेल. एकंदरीत भारत देशाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल परंतु भारत देशातील केंद्र व प्रत्येक राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून रोजगाराअभावी विकसनशील भारत देशाची आर्थिक परिस्थिती खिळखिळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत केंद्र शासनाने सांगोपांग सविस्तरपणे विचार विनिमय करुन विकास आराखड्यात प्रत्येक राज्यात उद्योग स्थापन करून उच्च शिक्षण सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारा लोक कल्याणकारी निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दल अध्यक्ष नंदू भाऊ गट्टूवार यांनी केली आहे.