धुळे शहरातील वरखेडी फाट्याजवळ आयसर ट्रकच्या भीषण अपघात

22

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.22जुलै):; मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहरा जवळ वरखेडी फाट्या परिसरात आज बुधवारी 21 जुलै रोजी शिरपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या आयसर ट्रक चालकाने नाष्टा विक्री करणाऱ्या लोडगाडी धारकास गाडीसह उडविल्यानंतर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक महामार्गावर पलटी झाला. यात सदर ट्रक हा बटाट्याने भरलेला असल्याचे समजते तर या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

परंतु सदर नाष्टा विकणाऱ्या लोड गाडीच्या पूर्णतः चुरा झाला असून नाष्टा विक्रेत्या व्यावसायिक या अपघातामध्ये जखमी झाला आहे.सदर ट्रक क्रमांक MH18 BG 6831 अपघातग्रस्त झाल्यामुळे या वाहनाच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या अपघातामुळे काही काढ मुंबई-आग्रा महामार्गावर ची वाहतूक विस्कळीत झाली होती.