ग्रामपंचायत जवराबोडी मेंढा येथे अविरोध निवडणूक

29

🔹जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांचे मार्गदर्शनात सरपंचपदी देवराव उईके यांची निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.22जुलै):- तालुक्यातील ग्रामपंचायत जवराबोडी (मेंढा )येथे अविरोध निवडनुक झाली. यात
प्रमोद चिमुरकर( जिल्हा परिषद सदस्य) यांचे मार्गदर्शनात ही निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी श्री.देवराव दिनाजी उईके हे अनुसूचित जमाती जनरल मधून अविरोध सरपंच म्हणून निवडून आले. तर या गावातील नागरिकांमध्ये एकच आनंदमय जल्लोष दिसून येत आहे. व गावकऱ्या कडून अभिनंदनाच्या वर्षाव सरपंच श्री. देवराव दिनाजी उईके यांच्यावर करण्यात आला.

ग्रामपंचायत जवराबोडी (मेंढा) येथील सदस्य व सदस्या,सरपंच देवराव दिनाजी उईके, उपसरपंच विवेकानंद कवळूजी थेरकर, सदस्य . बबन नीलकंठ लडके, सदस्या सौ. मायाबाई गिरीधर थेरकर, सदस्या सौ.भाग्यश्री सचिन नन्नवरे, सदस्या सौ. सपना श्रीकृष्ण बुजाडे, सदस्या सौ. गीताबाई शंकर मसराम , मा. सरपंच अविनाशजी शेंडे , जगन मसराम , मोरेश्वर पानसे , दिवाकर निकुरे , लक्ष्मण पानसे ई. तर निवडणूक अधिकारी सी. पी. केळझरकर , राऊत तलाठी यांनी निवडणुकीचे काम पहिले असून, जवराबोडी (मेंढा )ग्रामपंचायत वर काँग्रेसचे वर्चस्व आहे.