लयभारी साहित्य समुह इ बुक प्रकाशन आणि ऑनलाईन कवी संमेलन सोहळा संपन्न

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.23जुलै):-लयभारी साहित्य समूह आयोजित , आषाढी एकादशी निमित्त , पंढरीची वारी हा उपक्रम पंधरा दिवस घेऊन , पंढरीची वारी ह्या विषयावर काव्यलेखन केले . आणि 78 कवितांचा इ बुक मध्ये समावेश केला . आणि आषाढी एकादशी दिवशी ज्येष्ठ कवयित्री शामला पंडीत , कवयित्री रंजना मांगले , कवी संतोष रायबान सर यांच्या हस्ते इ बुक प्रकाशन सोहळा झाला . त्या सोहळ्याचे मुख्य आयोजन प्रमोद सूर्यवंशी यांनी केले . तर त्याच दिवशी ऑनलाईन झूम कवी संमेलनाचे नियोजन समूह संचालक अनिल केंगार यांनी केले . आणि कवी संमेलनाचे सूत्रसंचालन धनंजय माने यांनी आपल्या शैलीतून बहारदार केले . आणि कार्यक्रमाला रंगत आणली

वर्षा फटकाळे वराडे , संगीता महाजन , कु. वर्षा शिदोरे, सौ.कविता वालावलकर, सौ.शामला पंडित (दीक्षित)
सौ.वसुधा कोडगीरे, सौ.वैभवी मराठे , सौ.भाग्यश्री बागड, सौ.अनिता नागे/पाठे, सौ.रंजना मांगले , सौ.आम्रपाली धेंडे, सौ.सुचित्रा कुंचमवार , सौ.कल्पना निं.अंबुळकर , सौ.प्रांजली काळबेंडे , सौ.शशिकला गुंजाळ , सौ.वसुधा नाईक , सौ.योगिता जाधवसौ.नूतन पाटील , सौ.संगीता चव्हाण सौ.अंजली राजाध्यक्ष, सौ.सुनीता बहिरट, श्रीमती संगीता जामगे, विकास पाटील, श्री. हरिदास मा.गौतम, श्री.मधुकर गायकवाड, श्री.रोहिदास होले , श्री.गजानन दराडे, श्री.वसंत गवळी, श्री.रविकांत जाधव, श्री.सचिन पाटील, श्री. आमीर पटेल, विशाल पाटील, राकेश बुधाजी डाफळे ,अविनाश शिंदे संगीता महिरे साळवे ह्या सर्व सारस्वतांच्या काव्यातून इ बुक प्रकाशन सोहळा आणि ऑनलाईन झूम कवी संमेलन यशस्वीरित्या पार पडले