पिक कर्ज प्रकरणे तालुकास्तरावरच मंजूर करावीत – मा.आ.भीमसेन धोंडे यांची मागणी

25

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.23जुलै):-भारतीय स्टेट बँकेच्या शाखांकडे पिक कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर विभागीय कार्यालयांमध्ये मंजूर केली जात असल्यामुळे प्रकरणे मंजूर होण्यास विलंब होत असल्याने या प्रक्रियेमध्ये बदल करून तालुकास्तरावरील शाखा प्रबंधक यांना पिक कर्ज प्रकरणे मंजुरीचे अधिकार प्रदान करण्यात यावेत अशी मागणी माजी आमदार तथा शेतकरी नेते भीमसेन धोंडे यांनी अग्रणी बँक व्यवस्थापक आणि जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यात भारतीय स्टेट बँकेच्या २४ शाखा असुन सुमारे पाच हजार पीक कर्ज प्रकरणे दाखल आहेत. त्यातील आष्टीचे स्टेशन रोड शाखेचे १५० कर्ज प्रकरणे बीड विभागीय शाखेत आहेत त्यातील आजवर केवळ ११ प्रकरणे मंजुर करण्यात आले आहेत. यावरुन पीक कर्ज प्रकरणे मंजुरीची गती लक्षात येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची प्रकरणे बँकेच्या शाखेत दाखल त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्हा विभागीय शाखेकडे पाठविण्यात येतात. या प्रक्रियेस विलंब होत असल्यामुळे त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. याचा गांभीर्याने विचार करून तालुकास्तरावर प्रकरणे मंजूर करण्याचे अधिकार संबंधित शाखा प्रबंधक यांना देण्यात यावेत असेही निवेदनात मा.आ.धोंडे यांनी म्हटले आहे.