युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांनी केला कर्तव्यात कसूर करणाऱ्यां महावितरण अधिकारी मरकट याचा सत्कार

29

🔸युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांच्या कडून महावितरण वीज अभियंता यांची कानउघाडणी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मेहकर(दि.23जुलै):- येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे आज अंजनी बु जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मोळा,मोळी,शहापूर, लोणी गवळी, लावणा,उमरा,पिप्रीमाळी,रत्नापुर,साब्रा या गावामधील गावठाण लाईनचा विजपुरवठा सातत्याने खंडित होता.पावसाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे वरील गावामध्ये डासांच्या त्रासामुळे लहान मुले आजारी पडण्याच्या धोका निर्माण झाला आहे.

वरील समस्या गावकऱ्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांच्या पर्यंत पोचवल्या व तात्काळ ऋषीभाऊ जाधव यांनी महावितरण चे अधिकारी श्री.उईके व श्री. मरकट यांना धारेवर धरून त्याच्या कडून समस्या तात्काळ सोडून घेतल्या.व यावेळी उपसभापती बबनराव तुपे,उप.ता.प्रमुख समाधान साबळे,संचालक भागवत देशमुख, अशोक पसरटे,विलास आखाडे,बाळु जाधव,विशाल काळे,रवी शेळके, अमोल ठाकरे व गावातील संरपच व शिवसैनिक उपस्थित होते.