जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या पुनर्वसित गावांना सर्व मूलभूत सुविधा मिळवून देण्यास प्राधान्य देणार..आमदार राजेश एकडे

31

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

नांदुरा(दि.23जुलै):-जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या नवीन पुनर्वसित पातोंडा गावाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज आमदार राजेश एकडे यांनी केले.जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व पुनर्वसित गावांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.या भूमिपूजन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य तथा पातोंडा येथील सरपंच श्री.पुरुषोत्तम झाल्टे हे होते..

या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमराव पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.वसंतराव भोजने,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनराव पाटील,काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस श्री.निलेशभाऊ पाऊलझगडे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. भगवानभाऊ धांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.युवराज बापू देशमुख,शिवसेना तालुका प्रमुख श्री.संदीप पाटील,श्री.ईश्वर पांडव,श्री.प्रशांत देशमुख, श्री.सदाशिव धुळे,श्री.राजू हाडे पाटील,श्री.नारायण झाल्टे, श्री.रामदास तायडे,श्री.सुपडा गायगोळ,श्री.भागवत नेमाडे, श्री.श्रीकृष्ण काळमेघ, श्री.रामभाऊ पाचपोर,श्री.भास्कर वाकोडे,श्री.शिवशंकर झालटे, उपविभागीय अभियंता श्री.विजय चोपडे, श्री. सी. एस. पाटील,श्री.उमेश पाटील,शाखा अभियंता श्री.ससाने साहेब, श्री.ढवळे साहेब,श्री.राजपूत साहेब, श्री.काळे साहेब,पातोंडा येथील श्री.राजू रणित,श्री.सूनील हेलगे,श्री.एकनाथ झालटे, श्री.संजय नेमाडे,श्री.गजानन झाल्टे, श्री.रोशन झालटे, श्री.महादेव सुरसे, श्री.सुनील रनित, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.