कंधार पं.स.चे प्रभारी गटविकास अधिकारी के.एस.बळवंत याना हटविण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मराठा महासंग्राम संघटनेची मागणी

35

🔺प्रभारी बि.डी.ओ हटाओ और कंधार बचाओ नागरिकांतून संताप

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.23जुलै):-कंधार पंचायत समिती येथील सध्याचे प्रभारी गटविकास अधिकारी के.एस. बळवंत यांचे कर्तव्य शून्य व भ्रष्ट कारभारामुळे कंधार पंचायत समितीचे व कारभाराचा अक्षरशा बोजवारा उडाला येथील कामकाज अत्यंत भ्रष्ट व खुळखुळे झाले आहेत याचा त्रास मात्र सामान्य जनतेला होत आहेत गोरगरीब नागरिक आपली कामे करण्यासाठी पंचायत समिती कंधार येथील कार्यालयात येत असतात पण येथील बि.डी.ओ सह इतर कर्मचाऱ्याकडून त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

तसेच वेळेवर कधीच कामे होत नाहीत तर त्यासाठी अनेक खेटे सामान्य नागरिकास मारावे लागत आहेत याबाबत येथील प्रभारी गटविकास अधिकारी के एस बळवंत यांच्याकडे तक्रार केल्यास ते म्हणतात की मी येथे काही फुकट आलेलो नाही मला येथे पद मिळविण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे तुम्हाला काय करायचे आहे ते करा माझे काही वाकडे होणार नाही अशा उद्धट भाषेत ते उत्तर देत आसतात रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे मस्टर मागणी साठी प्रत्येक मस्टर साठी १००० रुपयांची मागणी केली जाते तसेच एक मागणीत एकच मस्टर दिले जाते पंचायत समिती कंधार चे प्रभारी बि.डी.ओ तसेच इतर कर्मचारी हे कधीच तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करत नाहीत सर्व कारभार हा केवळ कागदोपत्रीच चालू आहे घरकुलाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत व सदर प्रस्ताव मंजुरीसाठी आर्थिक मागणी केल्या जात आहे.

तसेच कंधार पंचायत समितीस १४ व्या वित्त आयोगाचा मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला असताना देखील तालुक्यातील गावांमध्ये रस्ते पिण्याचे पाणी नाल्या सौचालय पददिवे इतर सोयी सुविधा नाहीत मग १४ व्या वित्त आयोगाचा निधी जातो कुठे ? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडत आहे तसेच चौदाव्या वित्त आयोगाचे अंतर्गत बिले काढण्यासाठी पाच टक्के रक्कम घेतल्याशिवाय येथील प्रभारी बि.डी.ओ के.एस बळवंत बिलावर स्वाक्षऱ्या करीत नाहीत या सर्व प्रकारामुळे कंधार तालुक्यातील नागरिकांमध्ये येथील प्रभारी गटविकास अधिकारी के.एस.बळवंत यांच्या विरोध संताप व नाराजीचा सूर आहे नागरिकातून पंचायत समितीचे प्रभारी बि.डी.ओ हटाव और कंधार बचाव अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत वरील आशयाचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांसह सौ वर्षा ठाकूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची प्रत्यक्षात भेट घेऊन सदर निवेदन त्यांना देण्यात आले व कंधार पंचायत समितीचे प्रभारी बि.डी.ओ के.एस बळवंत यांची चौकशी होऊन चौकशीअंती त्यांच्याविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदविण्यात सह त्यांच्याविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच अशा भ्रष्ट बि.डी.ओ.के.एस.बळवंत यांची चौकशी होऊन चौकशी अति त्यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदविण्यात सहा त्यांच्याविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

तसेच अशा भ्रष्ट बि.डी.ओ.ची पंचायत समिती कंधार येथून हकालपट्टी करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा दिनांक १४.०८.२०२१ रोजी पर्यंत वरील प्रमाणे चौकशी व कारवाई न झाल्यास मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने स्वातंत्र्यदिन दिनांक १५.०८२०२१ रोजी जिल्हा परिषद नांदेड समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील सदर निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष प्रदीप पाटील हुंबाड नंदनवनकर मराठा महासंग्राम संघटना जिल्हाप्रमुख नांदेड तिरुपती पाटील भागानगरे जिल्हा सल्लागार नांदेड मधुकर पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सदरील निवेदनाच्या प्रति मा.जिल्हाधिकारी साहेब तसेच मा.पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांना देण्यात आले आहेत