राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्य ब्रम्हपुरी येथे भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न

23

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24जुलै):-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ना.अजितदादा पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कृपाल मेश्राम यांनी ख्रिस्तानंद रूग्णालय रक्तपेढी ब्रम्हपुरी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सदर रक्तदान शिबिरात एकुण ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर आत्मनुसंधान भुवैकुंठ अड्याळ टेकडी येथे ६२ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.व ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचार्थ दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्वादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव युनूस शेख, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष जगदीश उर्फ मोंटू पिलारे, तालुका अध्यक्ष वासुभाऊ सोंदरकर, चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महासचिव अतुल राऊत, रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे समन्वयक पै.अमोल ठेंगरी, परिक्षीत कांबडी, पै.विनीत मेश्राम, सुबोध शेंडे, अजय दर्वे, निकेश कांबडी, प्रशांत करंबे, तुषार उराडे, विनय दिवटे, तथागत बनकर, विष्णु कोसरे, तसेच ब्रम्हपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ब्रम्हपुरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..