धान उत्पादक शेतकऱ्यांना उर्वरित बोनस तात्काळ देण्याची मागणी.. आमदार बंटीभाऊ भांगडिया

59

🔸मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिले पत्र

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चिमूर(दि.24जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यात आधारभूत दराच्या खरेदी धानाचे शेतकऱ्यांना प्रलंबित जाहिर पैकी 50 टक्के प्राप्त बोनसचे वितरण योग्य प्रकारे होत असताना उर्वरित बोनस रक्कम तात्काळ देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराने शेतकऱ्यांचे दि महाराष्ट्र स्टेट को ऑफ मार्केटिंग फेडरेशन लि या संस्थेद्वारे खरीप व रब्बी धानाची खरेदी करण्यात आली.
शासनाने अंदाजित 27 कोटी पैकी 50 टक्के बोनस वितरण केल्याचे निदर्शनास येत आहे परंतु 50 टक्के बोनस वितरणात बरेच नोंदणीकृत व शासनास धान देऊन पात्र असलेले शेतकरी वंचित होत असल्याचा व वाटपात अनियमितता असल्याच्या अडचणीत शेतकरी कोरोनाची महामारी त्यामुळे आर्थिक कुचंबनेच्या तक्रारी आल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना 100 टक्के बोनस देण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांचे हित जोपासता येईल
शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.