शासकीय गायरान जमिनीवरील शेतीसाठी केलेली अतिक्रमणे नियमित करणे बाबत प्रशासनाकडून दिशाभूल

21

🔸यशवंत खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.25जुलै):-तालुक्यातील शासकीय गायरान जमीनीवर गेल्या अनेक वर्षांपासून कसत असलेले अतिक्रमण शेतकरी धारक यांच्या नावावर अद्यापपर्यंत जमीन न केल्याने त्यावर कारवाई करण्यात आली नसल्यामुळे प्रशासनाने दिशाभूल केल्याने दलित,आदिवासी,भटके,विमुक्त,भूमिहीन प्रवर्गातील अतिक्रमण धारकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी तहसिल समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार शारदा दळवी,नायब तहसिलदार निलिमा थेऊरकर यांनी आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.शुक्रवार दि.२३ जुलै रोजी सकाळी १ वाजता आष्टी तहसिल कार्यालयावर गायरान जमीन नियमित करुन सातबारा देण्यात यावा यासह विविध मागण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आष्टी तालुक्यातील शासकीय गायरान जमीनीवर अतिक्रमण धारकांचे अनेक वर्षापूर्वीचे अतिक्रमण असून ते शेती करत असताना यावर त्यांच्या नावावर शेती करण्यात आलेली नाही.या पुर्वी संघटनेच्या माध्यमातून अनेकवेळा मोर्चे आंदोलने,धरणे,रास्ता रोको,करण्यात आले परंतु शासन या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे दलित,आदिवासी,भटके,विमुक्त,भुमीहीन,प्रवर्गामधील असून या कसत असलेले गायरान धारक हे गायरान क्षेत्रावरील उत्पनातुन त्यांचे उदर निर्वाह भागवत आहेत.

तरी सदरचे शासकीय गायरान जमिनीवरील शेतीसाठी केलेली अतिक्रमणे नियमित करावे अन्यथा एकाही कर्मचाऱ्याला रस्तावर फिरु देणार नाही असा इशारा यशवंत खंडागळे यांनी प्रशासनाला दिला आहे.यावेळी पाटोदा वंचित चे नेते गोरख झेंड,तालुका अध्यक्ष ग्यानबा साळवे,बाळासाहेब घाटविसावे,सुदाम थोरात तसेच मोठे गायरान जमीन धारक उपस्थित होते.