बोधिसत्व बुद्धविहार यवतमाळ येथे आँनलाईन वर्षावास प्रवचन मालिकेचे उदघाटन

27

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.25जुलै):- दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका व जिल्हा शाखा यवतमाळ यांचे विद्यमाने बोधिसत्व बुद्धविहार यवतमाळ येथे दि.२४ जुलैला दुपारी ४ते ६ या वेळेवर आषाढी पोर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन ऑफलाईन व ऑनलाईन करण्यात आले होते.सर्वप्रथम तथागत बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुण्याचे वतीने पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन पुजा करण्यात आली. आणि सामुहिक त्रिसरण पंचशिल बुद्ध वंदना घेण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ तालुका शाखा अध्यक्ष मोहन भवरे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण डाॅ. ललित बोरकर उपाध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ यांनी केले.जिल्हा शाखा यवतमाळ चे अध्यक्ष रवि भगत यांनी उद्घाटनीय भाषण करून प्रवचन मालिकेचे रितसर उद्घाटन झाल्याचे जाहीर केले,

प्रमुख अतिथी म्हणुन राहुल राऊत कोषाध्यक्ष, रुपेश वानखेडे सरचिटणीस , रंजनाताई ताकसांडे उपाध्यक्ष , अंबादास नागदेवते अध्यक्ष शहर शाखा यवतमाळ ,सिध्दार्थ बन्सोड उपाध्यक्ष तालुका शाखा यवतमाळ हे प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच शांतीदुत मुळे घाटंजी नागोराव बनसोड आर्णि,मोरेश्वर देवतळे वणी, उज्वलाताई भवरे कळंब हे ऑनलाईन उपस्थित होते.विशाखाताई नन्नावरे केंद्रिय शिक्षिका यवतमाळ यांनी “आषाढी पोर्णिमा चे महत्व व वर्षावास ” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचलन गौतम कुंभारे सरचिटणीस तालुका शाखा यवतमाळ यांनी केले. विजय कांबळे कोषाध्यक्ष तालुका शाखा यवतमाळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमास धम्मबांधव ,केंद्रीय शिक्षिका, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य ,तालुका व जिल्हा शाखेचे पदाधिकारी ऑफलाईन व ऑनलाईन उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.आज दि.25 जुलैला “भगवान बुद्धाचा विशुद्ध मार्ग” या विषयावर आद.मोहन भवरे यांचे प्रवचन दुपारी ४ ते ६ या वेळेवर आपन या लिंकवर htts://meet.google.com/iag-savw -hvo ऑनलाईन उपस्थित राहवे