आष्टी येथे फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी,पालकांचा केला सत्कार

36

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.25जुलै):- येथील फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलने दहावी बोर्ड परीक्षेत सलग तिस-या वर्षीही १०० टक्के निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.यावर्षी दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांसह पालकांचा शुक्रवारी (दि.२३) मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.फिनिक्स शाळेतील एकूण १८ विद्यार्थी दहावी परीक्षेस बसले होते.यापैकी अबोली रामदास बनसोडे,धनश्री उत्तम पठाडे आणि रिया किशोर जांभळे या तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून पहिल्या येण्याचा मान मिळविला आहे.

तर धनश्री शेखर मुथा (९९ टक्के),अंशा असद शेख (९८.६० टक्के),प्रतिक्षा प्रमोद गळगटे (९८.६०),प्रेरणा किरण मेहेर (९८.६०),प्रणिता रामकिसन गिते (९४.२०),अरजान बागवान (९३.६०),आवेज शेख (९३),अभिनंदन मेहेर (९२.४०),विकास आबाजी लटपटे (९०.८०) या नऊ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्तीचे गुण मिळविले आहेत.शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल आष्टी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश कोरडे यांच्या हस्ते व प्राचार्य नागसेन कांबळे,संस्थेच्या अध्यक्षा सीमा वालेवाडीकर यांच्या उपस्थितित गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.

दहावीनंतरची शैक्षणिक आव्हाने कशी पेलावीत याबद्दल कोरडे यांनी मार्गदर्शन केले.प्राचार्य कांबळे यांनी कोरोना कालावधीतही चिकाटी ठेवून विद्यार्थ्यांनी ध्य य साध्य करावे असे आवाहन केले.या वेळी विलास कांबळे,शेख, निंबोरे, गर्जे,आफिया सय्यद,जुलेखा खान,सागर निकाळजे,गायकवाड,शिल्पा शेकडे,पल्लवी दाणी,शिल्पा सदावर्ते,छाया राऊत,निता चव्हाण,मोरे आदी शिक्षक,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.नंदिनी कांबळे हिने सूत्रसंचालन करून आभार मानले.