चादंवङ ला दुर्गभ्रमंती करत अनोखा वाढदिवस उत्साहात साजरा

25

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.25जुलै):-चांदवड तालुका भाजपा अनु. जमाती मोर्चा चे तालुकाध्यक्ष श्री संजय पाडवी ( बाळा ) यांनी त्यांचा आजचा वाढदिवस पौराणिक संदर्भ असलेल्या साडेतीन रोडगा डोंगरावर रामध्वजा उभारत व साडेतीन रोडग्यांचा नैवेद्य डोंग-या देवास अर्पण करत अनोख्या पध्दतीने आदिवासी जातीरिवाजा प्रमाणे निसर्गरम्य ठिकाणी निसर्ग देवता पूजन करून सर्व दुर्गप्रेमींना दूर्मिळ झाडांच्या माहीतीचे पुस्तक भेट दिली.
साडेतीन रोडगे डोंगराची, अनोखी प्राचीन कथा आहे. अगस्ती ऋषींनी स्वतःसाठी चार रोडगे बनविले होते व चांदवड नगरीत नागरिकांकडे त्यावर लावण्यासाठी तुप मागीतले लोकांनी तुप दिले नाही त्यामुळे रागावलेले ऋषींनी चांदवडला चांडाळ नगरीचा शाप दिला.

वआर्धा रोडगा गाईला देऊन साडेतीन रोडगे उंच डोंगरावर फेकले त्यातुन निर्माण झालेले हे डोंगर … पुढे वनवासात असतांना प्रभु श्रीराम यांचे या डोंगरावर अस्तीत्व होते व संपूर्ण परिसर शापमुक्त केला.अशी आख्यायिका आहे. लोक फक्त शापच लक्षात ठेवतात मात्र प्रभु श्रीरामांनी शापमुक्ती दिली हे लक्षात ठेवत नाहीत म्हणुन पाडवी यांनी या निमित्तानं हा अनोखा वाढदिवस साजरा केला.. सोबत श्री प्रकाश सुर्यवंशी , प्रफुल्ल सोनवणे , डॉ शिंदे , जितेंद्र डाके , सुताने सर , भक्ती सोनवणे , सिद्धी डाके , मानस कोल्हार , समीर सुताने…. आदी उपस्थित होते.