गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने भव्य रोजगार मेळावा

27

✒️गडचिरोली,विभागीय प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.25जुलै):-जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती करिता “भव्य रोजगार मेळावा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व त्या माध्यमातून गरजू युवक-युवती करिता रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधिक्षक अंकित गोयल, यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक कृती शाखेच्या वतीने आज दिनांक 24 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवती करिता जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगार तरुणांना गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने हैदराबाद येथे 35 युवकांना सुरक्षारक्षक पदी व 70 युवतींना नर्सिंग असिस्टंट पदी नियुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

आतापर्यंत 1580 युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी गडचिरोली पोलीस दलाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.यात 375 सुरक्षारक्षक, 1060 नर्सिंग असिस्टंट, 100 हाँस्पिटॅलिटी, 45 ऑटोमोबाईल तसेच 129 युवक-युवतींना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत,सुरक्षारक्षक व नर्सिंग असिस्टंट म्हणून निवड झालेल्या उमेदवारांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून नेहमी तुमच्या पाठीशी राहील.

आपले मित्र व आप्तस्वकीय यांना रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्याने देखील गडचिरोली पोलीस दलाचे उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधी चा लाभ घ्यावा व आपल्या कुटुंबियांचे राहणीमान उंचवावे, असे आपल्या मनोगतात व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एम्स प्रोटेक्‍शन प्रा लि. हैदराबाद चे मल्लेश यादव, लाइफ सर्कल हेल्थ सर्व्हिसेस प्रा.ली. हैदराबाद चे श्रीनिवास सुधाला, श्री महालक्ष्मी ओल्ड एज होम हैदराबाद चे किसन कोर्रा, व अभया ओल्ड एज होम हैदराबाद च्या अंकिता बोरकर यांचे पोलीस अधीक्षक यांनी आभार व्यक्त केले, गडचिरोली जिल्हा पोलीस दला मार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागातील युवक युवतींसाठी वेळोवेळी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून आतापर्यंत 1580 युवक-युवतींना सुरक्षारक्षक नर्सिंग असिस्टंट हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया अहेरी, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) अप्पर पोलीस अधीक्षक सौमय मुंडे अभियान, हे उपस्थित होते, सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या नागरिक कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल साहेब यांनी कौतुक केले,