भारतीय मजदूर संघाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

20

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

कुकुडवाड(दि.26जुलै):-ता. माण, येथे अखिल भारतीय मजदूर संघाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना काळात विशिष्ट सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी एकात्मिक बालविकास योजनेच्या जिल्हा पर्यवेक्षिका सौ माधुरी खंडोजी कुलकर्णी, श्री तुषार कुलकर्णी सर, श्रीराम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद हुद्देदार, विजय काशीद सर उपस्थित होते.

या वेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा प्रतिनिधी जयंत शेटे यांनी प्रास्ताविक केले व भारतीय मजदूर संघाच्या कार्यपद्धतीबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले, गत 66 वर्षांमधील संघाचे कार्य व सध्या मजदूर संघाच्या वतीने कोरोना काळात शासनाकडून मजुरांसाठी मंजूर करवून आणलेल्या योजनांची सविस्तर माहिती सादर केली, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ माधुरी कुलकर्णी यांचे हस्ते या वेळी कोरोना योद्ध्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी बोलताना सौ कुलकर्णी म्हणाल्या की अंगणवाडी सेविका या कोरोना काळात दुर्लक्षित राहिलेल्या कोरोना योद्ध्या आहेत.

आज मजदूर संघाच्या वतीने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही बाब खूप अभिमानास्पद आहे, यावेळी अंगणवाडी सेविकांनी एकमुखाने मागणी केली की शासनाने देखील अंगणवाडी सेविकांचे मागील वर्षातील घोषित बाकी विशेष मानधन त्वरित द्यावे.

या कार्यक्रमास उपस्थित अंगणवाडी सेविकांबरोबरच लसीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावले बद्दल विजय काशीद सर यांचा ही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला
उपस्थितांचे स्वागत व आभार भारतीय मजदूर संघाचे माण तालुका प्रतिनिधी जावेदखान मुलाणी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलिबाबा नदाफ, सुनील सुतार व संजय रणसिंग यांनी महत्वाची भूमिका बजावली.