शाळा बंद-शिक्षण सुरू

28

इच्छा तिथे मार्ग ……

▪️प्रस्तावना :-

आपल्या देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशानुसार १७ मार्च २०२० पासून संपूर्ण शाळा तात्पुरत्या स्वरूपात काही कालावधी करीता बंद करण्यात आल्या. पण दिवसागानीक कोरोनाची लागन राज्यात वाढतच गेली.शाळा पुन्हा सुरु होण्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा. ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद् पुणे यानीं अभ्यासमाला हा उपक्रम सुरु केला व विधार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरु झाले.

पण ग्रामीण भागातील विधार्थी यांचे करीता ऑनलाइन शिक्षणाची संकल्पना फार कठीन होती. सुरुवातीला मी आमच्या शाळेतील वर्ग ६ वि व् वर्ग ७ वि च्या विधार्थी यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला. विधार्थ्याना नियमित राज्यस्तर कडून येणारी अभ्यास मालिका विधार्थ्यापर्यंत नियमित पाठवित होतो. परन्तु सर्वच विधार्थी यांचे कड़े एंड्राइड मोबाईल नसल्यामुळे फ़क्त ४५ टक्के विधार्थी ग्रुप मध्ये सहभागी होते. उर्वरित ५५ टक्के विधार्थिपर्यंत पोह्चन्याचे उद्दिष्ट बाकी होते .

तेव्हा आमच्या गोंडपिपरी तालुक्यात कु.अर्चना जिरकुंटावर विषय शिक्षिका धानापुर या एका उपक्रमशील शिक्षिकेनी अभ्यास गट गोंडपिपरी आजचा स्वाध्याय नावाचा एक ग्रुप तयार केला व् त्या अभ्यास गट मध्ये मला वर्ग ६वी च्या मराठी विषयाचा स्वाध्याय दररोज पाठविन्याची जबाबदारी मला सोपविण्यात आली.


▪️नियोजन :-

यानंतर आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख आमचे प्रेरणास्थान आदरणीय महल्ले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अभ्यासाला सुरुवात करण्यात आली.यासाठी माझ्या शाळेतील सहकारी शिक्षक श्री.व्ही.के.गोंडे व श्री.आर.बी.उमरे या दोन्ही तन्त्रस्नेही शिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळाले व् पुढील अभ्यास विधार्थ्यांपर्यंत कशाप्रकारे पोह्चवीता येइल या विषयी चर्चा करुण प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली.

▪️उदिष्ट:

१) ग्रामीण भागातील १०० टक्के विधार्थ्याना शिक्षनाच्या प्रवाहात आनने.

२) विधार्थ्याना स्वंय अध्ययनाची सवय लावणे.

▪️कार्यवाही :
अभ्यास गट गोंडपिपरी द्वारा दररोजचा सर्व विषयाचा स्वाध्याय आमच्या पर्यंत पोहचत होता. तो सर्व विधार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मी वर्ग ६ वि व् वर्ग ७ वि मधील विधार्थ्यांचे पाच पाचमुलांचे एक या प्रमाणे वर्ग ७ वि चे सहा ग्रुप व् वर्ग ६ वि चे पांच ग्रुप तयार केलेत.या नंतर अभ्यास गट गोंडपिपरी कडून मिळणारा स्वाध्याय प्रिंट करून प्रत्येक गटांना देने चालू केले. व तो स्वाध्याय स्वयं अध्ययननातुन सोड्विन्यास सांगितले. मोबाइल द्वारे मार्गदर्शन गटनिहाय चालूच असायचे व स्वध्यायाची एक प्रिंट शाळेत ठेवायची व प्रत्येक आठावड्याला स्वाध्याय तपासने चालू ठेवले.

अभ्यासासोबत अभ्यास गट द्वारा विधार्थियाच्या विविध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात येत होत्या. त्या स्पर्धा मध्ये सुद्धा आमच्या शाळेतिल विद्यार्थ्यांना सहभाग घेवुन तालुक्यातुंन प्रथम येण्याचा मान आमच्या शाळेने पटकाविला. स्पर्धेंची नावे – चित्रकला स्पर्धा, मातकाम स्पर्धा, गणपति उत्सव, कोरोना काळातिल ध्वजारोहन, निबंध स्पर्धा, मातीचे बैल तयार करने.

 

▪️आलेल्या अडचणी व उपाय :

विद्यार्थी स्वयं अध्ययन करुन स्वाध्याय सोडवू लागले परन्तु त्यांचे फीडबैक घेण्यासाठी दुसर्या आठवड्याच्या प्रत्येक सोमवार ला विधार्थ्यांचे स्वाध्याय तपसाने चालू केले व ग्रुप ला मार्गदर्शन करण्यात येऊ लागले

▪️सहभागी विद्यार्थी :

हा उपक्रम माज्या शाळेतिल वर्ग साहवी व सातवी मधील एकून ५६ विधार्थी सोडवित असून विद्यार्थी आवडीने स्वाध्याय सोडवित आहेत.

सहकार्य :
या उप्क्रमाची संकल्पना जेव्हा मी पथक भेट करीता आलेले केंद्राचे केन्द्रप्रमुख आदरणीय श्री.टी.आर. महल्ले सरांना सांगितली तेव्हा तर त्यांनी माझे वैयक्तिक रजिस्टर व स्वाध्याय फाइल बघून सर तुमचे कार्य अभिनंदनीय आहे असे सांगुन प्रोत्साहन देवून कार्य करण्यास अधिक प्रेरित केले. हे करीत असताना प्रिंट काढण्यासाठी शाळेतिल तंत्रस्नेही शिक्षक श्री. गोंडे सर व श्री. उमरे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वय प्रेरणेने गावातील दोन स्वयंसेवक सुद्धा मिळाले.

▪️परिणाम :

ग्रामीण भागातील विधार्थाना स्वाध्याय मिलाल्यनांतर विधार्थी स्वता स्वयं अध्ययन करुन अभ्यास करतात. गरजेनुसार पालकांना विधार्थाना मोबाईल द्वारे अडचणी दूर केल्या जातात. विधार्थी स्वाध्याय केवा मिळतो याची आतुरतेने वाट बघत असतात. या उपक्रमाचे पालक तथा केन्द्रप्रमुख यान्चेकडून कौतुक केले जात आहे.

✒️लेेखक:-श्री.गौतम दाउजी उराडे (वि.शि.)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा, केंद्र-विट्ठलवाडा प. स. गोंडपीपरी जि. चंद्रपूर