अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीच्या पिकांचे आणि घराचे त्वरीत पंचनामा करून मदत द्यावी -सुदामभाऊ राठोड यांची मागणी

21

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.27जुलै):-अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीच्या पिकांचे आणि घराचे त्वरीत पंचनामा करून मदत द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले.
यावेळी विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड, सोशल मीडिया अध्यक्ष विशाल राठोड, जिवती तालुका युवा आघाडी अध्यक्ष अरविंद चव्हाण, युवा आघाडी जिवती शहर अध्यक्ष विनोद पवार, प्रदीप सोयाम, गणेश कदम, सुनील शेळके, उध्दव गोतावळे, दलित आघाडी तालुकाप्रमुख करण चव्हाण व जिवती तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात जिवती तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीतील पीकांचे आणि घराची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे.

नुकसानग्रस्त कुटूंबाला प्रति हेक्टर ५०,०००/- रुपये आणि ज्यांच्या घराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांना प्रति घर दोन लाख रुपयाची मदत तात्काळ द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.पावसामुळे शेतीमधील उभा पीक वाहून गेले, आणि घर सुद्धा बुडून गेले व घरातील अन्न धान्य कपडे सर्व वाहून गेले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी कष्टकऱ्यांचे संसार उघड्यावर आलेले आहे अशी व्यथा निवेदनात नमूद करण्यात आली.

मौका पंचनामा करून तात्काळ पीडितांना 15 दिवसाच्या आत मदत जाहीर न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर सुदाम राठोड यांनी दिला आहे