मुकुटबन ठाणेदाराची बदली करून कारवाही करण्याची मागणी

289

🔺पोलीस महासंचालकाकडे बेरोजगार युवकांनी दिली लेखी तक्रार

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

झरी(जामनी.दि.27जुलै):- तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी एकत्र येत मुकुटबन परिसरातील कोळसा खदान आणि सिमेंट उधोगामध्ये स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रशिक्षण केंद्र उभारून त्यांना रोजगार उपलब्ध द्या. अशा मागणीचे निवेदन ७० ते ८० बेरोजगार युवकांनी कँपनी कडे केली.मात्र दोन दिवसानंतर एका कँपनी प्रशासनातील अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मुकुटबन ठाणेदार धर्मा सोनुने यांनी निवेदनकर्त्याच्या नातेवाईकाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवून . तुझ्या पुतण्यावर खडणीचे गृहणे दाखल करून जबर युवकांना मारहाण करण्याची धमकी दिली.या घटनेमुळे सर्व निवेदनकर्त्या सुशिक्षित युवकांच्या मनात पोलीस प्रशासनातील अधिकार्याविषयी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रक्षण करणारेच जर भक्षण करतील तर आह्मी जगावे कसे असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडला आहे.घराबाहेर पडताना सुद्धा अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

झरी तालुक्यात आतापर्यंत ५ मोठ्या खदाणी तसेच सिमेंट उधोग आहे.व भविष्यात सुद्धा अनेक कोळसा खदाणी आणि डोलोमाईन्स होणार हे निश्चित आहे.तालुक्यात कोळसा, चुनखडक, इतर धातूचा साठा भौगोलिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असल्याने अनेक मोठं भांडवलदार झरी तालुक्यात येत आहे.मोठं मोठे उधोग उभारून करोडोची कमाई करीत आहे.तरी सुद्धा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण हा उधोगमध्ये काम करण्यासाठी लागणारे शिक्षण घेऊनही बेरोजगार आहे.

काही युवक लोकप्रतिनिधी याना भेटून आपल्या समस्या सांगतात.पण लोकप्रतिनिधी सुद्धा त्याच्या रोजगाराच्या विषयावर बोलायला तयार नाही.त्यामुळे स्थानिक युवकांनी एकत्र येत कँपनी प्रशासनाला रोजगाराची निवेदनातून मागणी केली. पण स्थानिक पोलीस ठाणेदार यांचे कंपनीतील काही अधिकाऱ्यांसोबत अतिशय घनिष्ट असे संबंध असल्यामुळे कँपनी समोर १० ते १५ जरी युवक जमा झाले तरी सुद्धा पोलीस प्रशासनातील कर्मचारी हे तात्काळ हजर होतात.काही पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग कमी तर कँपनी मध्ये AC कॅबिन, व गाडीत जास्त दिसत असल्याचे चित्र परिसरात दिसतआहे.मुकुटबनमध्ये गोतस्करी, खुले आम दारू विक्री राजरोज पणे सुरू असते आहे.पण या सर्वांवर ठाणेदाराचा आशीर्वाद आहे.

यामुळे अवैध धंदेवाल्याना पाठबळ मिळत आहे. मुकुटबन परिसरातील अवैध दारू ,गोतस्करीची माहिती देऊन सुद्धा कारवाही होत नाही.काही युवकांच्या मोबाईल मध्ये सुद्धा गोतस्करी ,व खुले आम दारू विक्री करतानाचे विडिओ आहे.अशी माहिती आहे.मुकुटबन पोलीस प्रशासनाचे घनिष्ठ संबंधामुळे कुणी पुहना तक्रार देण्यासाठी समोर येत नाही. मुकुटबन पोलीस स्टेशन मधील ठाणेदाराची सीडीआर व पोलीस स्टेशन मधील CCTV फुटेज काळलयांतर सत्य समोर येऊ शकते.

सामान्य बेरोजगार युवक आपल्या हक्कासाठी रोजगाराची मागणी करतात हे ठाणेदाराला खटकत असून आपले कॅम्पनी सोबत असलेले चांगले संबंध टिकावे. व कँपनी कडून मलाई खायला मिळावी. यासाठीच सुशिक्षित युवकवर खोटे गृहणे दाखल करून मारहाण करण्याची धमकी दिली.असे निवेदनकर्त्या युवकात व परिसरातील नागरिकांत चर्चा रंगत आहे.धमकीमुळे सर्व युवकांनी मुकुटबन येथील ठाणेदाराची तात्काळ बदली करून त्यांच्यावर कारवाही करावी. अशी मागणी यवतमाळ पोलीस अधीक्षक भुजबळ , पोलीस महासंचालक ,सचिव राज्य मानवी हक्क आयोगावाकडे केली आहे.