राष्ट्रीय विश्‍वगामी ह्यूमन राईट्स महासंघाच्या शिंदखेडा महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ. पूजा नितीन खडसे यांची बिनविरोध निवड

24

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.27जुलै):- (श. प्र.) सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असलेल्या पूजा नितीन खडसे यांची राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट संघटनेच्या शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रमेश देसाई, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रज्ञाताई कांबळे, महाराष्ट्र सचिव माधुरीताई कुलकर्णी, आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्रिकांतदादा मोरे यांच्या सहकार्याने ह्युमन राईटस संघाच्या तालुका अध्यक्ष पदी सौ. पूजा नितीन खडसे रा. दोंडाईचा यांची शिंदखेडा महिला तालुकाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

सदर निवडीचे धुळे जिल्हा अध्यक्ष जयेश प्रवीण वावदे,
सुवर्णा पोपट खैरनार, उपाध्यक्षा मनोज सोनू पाटील, शिरपूर तालुका संघटना यासह आदींनी अभिनंदन केले आहे..