जिवती शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्याकडून शासकीय नियमांचे उल्लंघन ! अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्याना “पेट्याने”माल देण्याची खात्रीलायक माहिती

22

🔹कोणाच्या आशीर्वादाने कोण भूमिका बजावत असल्याचे शंकेला पेव….!

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.27जुलै):-एप्रिल 2015 ला चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या दारूबंदी च्या शासकीय निर्णयानंतर, जिल्ह्यात अवैध दारू च्या महापुराने अक्षरशः हुडदंब मांडला गेल्या होता, तर अबालवृद्धा पासून ते महिला, युवा पिढी, शाळकरी मुले सुद्धा अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात सक्रिय झाल्याने जिल्ह्यात पोलीस यंत्रनेचे काम चार पटीने वाढल्याचे गुन्हेगारी आकडेवारी वरून बघायला मिळाले.

सक्रिय पोलीस यंत्रनेणे जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवरत मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद पो. स्टे. ला सुद्धा केली परंतु महाविकास आघाडी सरकार ने जिल्ह्यातील दारूबंदी उठवीण्याच्या घेतलेल्या निर्णयाने ह्या दारू तस्करांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविला असून खुलेआम अवैध रित्या दारू काही खेळयात विकत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते ,यांना जिवती शहरातील परवानाधारक देशी व विदेशी मद्य विक्रेते शासकीय नियमावली ला बगल देत खुलेआम “पेटी” ने स्टॉक मध्ये माल देत असून त्याची वाहतूक शहरातून भरदिवसा सरेआम होतं आहे.

तर लॉकडाऊन दरम्यान ईतर व्यवसायिकांना वेळेच बंधन व कडक शिस्त असतांना शहरातील परवाना धारक मद्य विक्रेत्यांना कुठलेही बंधन नसल्यागत “दिसायला बंद दार आतून खुले दार” दारू विक्री चालू असल्याचे स्पष्ट दिसत असतांना सुद्धा संबंधित प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे संबंधित प्रशासनाच्या अकार्यक्षम भूमिकेवर नागरिकांतून प्रश्न उपस्थित केले जात असून “अर्थपूर्ण’ व्यवहाराने सेटलमेंट प्रणाली चा वापर होतं असल्याचे सर्व स्तरातून चर्चेला उधाण आले आहे