जागतिक मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह अंतर्गत स्पर्धेत ब्रम्हपुरीकर

28

🔹डॉ.आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील तृप्ती जांभूळकर व चारू दोनाडकर अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविला

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.27जुलै):- महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित जागतिक मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह दि 28 मे ते 5 जून या कालावधीत विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आले होते त्या अनुषंगाने कोविड महामारी चा विचार करता सर्व उपक्रम शाळा कॉलेज नी दुरस्त पद्धतीचा वापर करून मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन या जनजागृती सप्ताह कार्यक्रमात सहभाग घेतला होता त्यात स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. सदर जनजागृती सप्ताह कार्यक्रमाच्या अंतर्गत पोस्टर ,चित्रकला,कविता,निबंध,घोषवाक्य,विषयाशी संबंधित स्पर्धा घेण्यात आले होते.

यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील कुमारी तृप्ती विवेक जांभूळकर हिने घोषवाक्य स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला तर कुमारी चारू लोचन दोनाडकर हिने चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले.त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.देवेश कांबळे,प्राचार्य हक, प्रा. शिलवंत रामटेके पर्यवेक्षक ,प्राध्यापिका सरोज शिंगाडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी अनिल चीलमावर साहेब ,नरेश रामटेके विषय तज्ञ , आदींनी अभिनंदन केले आहे.