गेवराईत श्री.विठ्ठल रुक्मिणी व संत सेनाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित

26

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

गेवराई (दि.27जुलै):- गेवराई येथील श्री . विठ्ठल रुक्मिणी व संत सेनाजी महाराज मंदिर, सावता नगर ,तहसील रोड, गेवराई येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.31/07/2021 शनिवार रोजी दुपारी 12 .05 वाजता आयोजित करण्यात आला आहे

तसेच मूर्ती स्थापना श्री ह. भ. प. दिलीप बाबा घोगे( चिंतेश्वर संस्थान, गेवराई) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार श्री. श्री.लक्ष्मणराव पवार, माजी आमदार श्री.अमरसिंहजी पंडित,माजी मंत्री श्री.बदामराव पंडित, लातूरचे उद्योगपती श्री. रामदास दादा पवार व तसेच राजकीय, सामाजिक, व नाभिक समाजातील नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व नाभिक समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.