भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

30

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

दिग्रस(दि.28जुलै):– दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस यांच्या वतीने इयत्ता १० वी मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याला तालुकाध्यक्ष विनायक देवतळे, रमेश वहीले, प्रदिप नगराळे, एकनाथ मोगले उत्तम इंगोले, पुरुषोत्तम मेश्राम, नंदू गुजर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

या गुणवंत विद्यार्थीचा सत्कार
पियुष सुरेश वानखेडे १००%,
कु.परी राहूल इंगोले ९९.४०%,
अर्पित संजय देवस्थळे ९८.४०%,
निर्गुन आंनदा कांबळे ९६.४०%५,सिद्धार्थ धनू मस्के ९५.४०%,
कु.गुंजन रुपेश कऱ्हाडे ९३.००%,
कु.प्रियल नंदू गुजर ९१.४०%,
तनमय जवादे ७६.४०% ,
वरील विद्यार्थ्यांना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.