मैदानातील माणसं

26

सा-या महाराष्ट्रात महापूराच्या थैमाने हाहाकार माजला असून अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याने नदीजवळील माणसाचे आयुष्य उध्दवस्त झाले आहे.नदी ही मानवाच्या विकासातील महत्वाचा नैसर्गिक घटक आहे.नदीच्या खोऱ्यातच प्राचिन सभ्यता उदयास आल्या.नदीमुळेच माणूस प्रगती करू शकला पण आज मानवाच्या हस्तक्षेपामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.अवैध बांधकाम,भांडवली रिसोर्ट ,विविध बांध ,वाढते शहरीकरण ,वृक्षतोड,अवैध रेती उत्खनन अशा गोष्टीने नदीचे रूप बदलले आहे.तिचे मोठे असलेले पात्र अरूंद झाले आहे.आज अनेक नद्या शेवटचा श्वास मोजत आहेत.तर काही नद्यांनी आपले अस्तित्व समाप्त केले आहे.

मैदानातील माणसाचं जगणं या कोरोना महामारीनं काळोखमय केलं आहे.महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने अनेक गावे व शहरे जलमय झाले आहे.मैदानात जगणाऱ्या माणसाचं जीवन यांनी जमीनदोस्त झालं आहे.एनडीआरफ व हवाई दलाची मदत घेऊन लोकांना वाचवण्याचा कशोसीने प्रयत्न करत आहेत पण ही व्यवस्था तोडगी पडत आहे.महापूराचे कवित्व काही दिवस चर्चेत राहिल परत जैसे थे अशी आपली गत झालेली आहे.कोरोनाच्या महामारीने देशात अघोषित आणीबाणी निर्माण झाली आहे.मैदानातील माणसाचं आयुष्य काळोखाच्या गर्भगुहेत बंदिस्त झालं आहे.नुकतचं पेगासस नावाचं नवीनचं जासूसी सॉप्टेअर जगाच्या पातळीवर उजागर झाल्यानं भारतीय संविधानाने दिलेले आपले अभिव्यक्त स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.डिजिटल नावाचं पेगासस ही यंत्रणा वापरून आपली राजकिय पोळी शेकण्याच्या प्रयत्नात सरकार तर नव्हते ना..!हा यक्षप्रश्न भारतीयांना पडला आहे.

हा देश बिनडोक्याचा बनविण्याचा घाट घातला जात आहे.वर्तमान शासनव्यवस्था संवैधानीक व्यवस्था नष्ठ करत चालली आहे.विरोधी पक्षनेता , प्रशासकिय अधिकारी ,विचारवंत ,कायदेतंज्ज्ञ तसेच अनेक अँक्टिव्हिस्ट यांचे फोन टँप करून बँलकमेलिंग करण्यासाठी पेगासस सॉप्टेअरचा उपयोग होत असावा असा कयास लोकांना वाटतो आहे.दोन वर्षापासून ज्या पध्दतीने काम सुरू आहे ते यावरून असे लक्षात येते की ,भारत लुटो भारत डूबो अशी भूमिका देशनेतृत्वाची दिसून येत आहे.
माणसाचं अस्तित्व फक्त राजकारण केल्याने पूर्ण होत नाही.त्याला सामाजिक व आर्थिक विकासाची जोड असावी लागते.अर्थव्यवस्थेचे केंद्रिकरण होत असल्याने मैदानातील माणसं हैरानं आहेत.माणसाला स्वातंत्र्य,समता ,बंधुभाव व न्याय यांची हमी देणारी राज्यव्यवस्था हवी आहे.देशाचा इतिहास हा रक्तरंजित असाच राहिला आहे.पून्हा हीच नीती वापल्या जात आहे.देशाची लोकशाही उखळून फेकाण्याचे कटकारस्थान दिवसेन दिवस सुरू आहेत.

भारत हा एक प्रजासत्ताक देश असतांना स्वतःच्या फायद्यासाठी देशाला दुसऱ्यांच्या सॉप्टेअरमध्ये अंकित करण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे.देशातील मुख्य प्रश्नाला बगल देऊन देश खदखदत ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहेत.मैदानातील माणसाला त्यांचे जीवन कधी प्रगतीपथावर जाऊ नये यांच्यासाठी सारी यंत्रणा काम करत आहे.भटके,विमुक्त,वंचित,पिडीत,आदिवासी,मागासवर्गीय,धार्मिक अल्पसंख्यांक ,स्त्री या साऱ्यांच्या जीवनातील लोकशाहीचा सूर्योदय लृप्त होत आहे.एक वेळच्या जेवणासाठी, पाण्यासाठी,अंगावरील कपड्यासाठी ,मुलांच्या भविष्यासाठी तो सातत्याने धडपडत आहे.हा माणूस असं जीवन का जगतो या विषयी सरकारला काही देणे घेणे नाही.

त्यांना पेगासस सहारा मिळाल्यानं ते कोणत्याही निवडणूकीला भीत नाही.बँलेट पेपरवर जोपर्यंत भारतीय लोकसभेच्या निवडणूका होत नाही तोपर्यंत वर्तमान शासनाला आपण पराजीत करू शकत नाही.परंतु त्यांची नस आपल्या हातात आहे.ती म्हणजे संविधानीक महाऊर्जा .आता साऱ्या मैदानातील माणसानं आपला आळस झटकून आंदोलनात उडी घ्यायला हवी.लोकशाहीला भग्नावस्था आणणाऱ्या सरकारला सत्तेखाली आपण खेचले पाहिजे.उठा दोस्तांनो आपल्याकडे गमावण्यासारखं काही नाही.मिळविण्यासाठी भरपूर आहे.नव्या लढाईचं शस्त्र पाजवून मैदानातील माणसासाठी क्रांतीची मशाल बनलो पाहिजे.पेगासस जासूसी सॉप्टेअरचे सत्यत्व तपासले पाहिजे.संविधानिक मार्गाने आपला आवाज बुलंद केला पाहिजे.मैदानातील माणसांना न्याय मिळवून दिला पाहिजे.नद्यांना वाचवलं पाहिजे.नदीजोड प्रकल्पाची बांधणी केली पाहिजे..

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००