कोल्हापूरच्या बोंद्रे परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी

28

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.28जुलै):-कोल्हापूर शहराला टॅंकरने पाणीपुरवठा करणे हे वाटते तितके सोपे नाही पाण्याची होणारी समस्या व पाण्यावाचून जनतेचे होणारे हाल पाहून कोल्हापूर मधील माजी महापौर शोभा बोंद्रे व माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्या परिवाराने कोल्हापुरातील अनेक ठिकाणी गेले तीन दिवस घरोघरी जाऊन पाणी पोहोच करण्याचे काम केले.कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुराचे सामान्य जनजीवनाची दैना उडाली आहे. कधी नव्हे इतका प्रचंड पाऊस महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले.

त्याचबरोबर पाण्यामुळे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेले त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठा बेमुदत काळासाठी बंद केला व टँकरने प्रत्येक विभागात पाणीपुरवठा केला जाईल असे जाहीर केले.इंद्रजित बोंद्रे व त्यांच्या मातोश्री शोभा बोंद्रे हे प्रत्येक सामाजिक कार्यात व अडचणीच्या काळात सदैव अग्रेसर असतात. या कामी त्यांना पंडित दादा बोंद्रे व विभागातील मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले. बोंद्रे परिवार यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.