हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काढण्यात आला आक्रोश मोर्चा

23

🔸पेट्रोल-डिझेल व सिलेंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी

🔹ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करून आरक्षण देण्याची सुद्धा मागणी

✒️मो. इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.२८जुलै):-पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ कमी करण्याबाबत तसेच ०२ ऑगस्ट २०१९ ला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण कपातीचा अध्यादेश काढला तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात दिनांक २८ जुलै २०२१ रोज बुधवारला हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध व्यक्त करत आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा संत तुकडोजी चौकापासून, कारंजा चौक, इंदिरा गांधी चौक ,गोल बाजार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक होत तहसील कार्यालयावर धडकला व निषेध प्रदर्शन करत पेट्रोल-डिझेल व गॅस सिलेंडरची दरवाढ तसेच ओबीसी समाजाची जनगणना करून आरक्षण द्या अशा मोठमोठ्याने घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.

मोर्चामध्ये विशेष आकर्षित तीन चाकी रिक्षा वर मोटर सायकल ,गॅस सिलेंडर व तेलाचा पिपा ठेवून त्यांना पुष्पहार घालून मोर्चा काढण्यात आली तसेच घोड्याच्या सुद्धा सहभाग होता.
मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून देशांमध्ये कोरूना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून सर्व देश वासी यामुळे आर्थिकदृष्ट्या भरून निघाले आहेत. अशातच केंद्र सरकार द्वारे वेळोवेळी पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरची झालेली दरवाढ ही देशवासियांसाठी व शेतकरी यांच्यासाठी मोठी अन्यायकारक आहे.सध्या शेतकरी,शेतमजूर ,कामगार, व्यापाऱ्यांचे व सर्वसामान्य लोकांचे अर्थचक्र पूर्णपणे बंद झालेले असून नागरिक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत, त्यांच्यासमोर उपजीविकेसाठी मोठे संकट निर्माण झाले आहे. अशातच पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

केंद्र व राज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमून ओबीसी समाजाची जनगणना करून आरक्षण द्यावे .सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार व लोकप्रतिनिधी यांनी दाखल केलेली पूनर्विचार याचिका फेटाळून लावली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही असा आदेश काढला आहे. ०४ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील धुळे, नंदुरबार, पालघर, वाशिम, अकोला व नागपूर येथील १९ जिल्हा परिषद सदस्यांना एकूण आरक्षणाच्या ५०% टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण मिळणार नाही या आदेशावरून अपात्र ठरविण्यात आले होते. या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व १९ लोकप्रतिनिधीच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने वारंवार सांगून केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणना करून आकडेवारी दिली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली असली तरी आता राज्य सरकारने हा विषय घटनापीठाकडे घेऊन गेले पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय दिला पाहिजे.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाने प्रकरण कोर्टात असताना कोर्टाने केंद्र सरकारला ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती? असे विचारले होते. कोर्टाने सांगूनही भाजप सरकारने दुर्लक्ष करून आकडेवारी दिली नाही .त्यामुळे कोर्टाने १९३१ ची लोकसंख्या लक्षात घेता हा निकाल दिला. त्यामुळे ओबीसी समाजाला राजकीय व्यवस्थेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा हा डाव आहे. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला आहे.तरी पेट्रोल-डिझेल व गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेण्यात यावी तसेच केंद्र व राज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमून ओबीसी समाजाची जनगणना करून आरक्षण द्यावे तसेच ०२ ऑगस्ट २०१९ ला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण कपातीचा अध्यादेश काढला तो रद्द करण्यात यावा.

अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यासह हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे,दशरथ ठाकरे, बुरकोणीचे सरपंच विजय बोरकर, संतोषराव तिमांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस गौरव घोडे, प्रशांत लोणकर, शकील अहमद, विपुल थुल, नितीन नवरखेडे, मनोज बुरीले अविनाश नवरखेडे, सुनील ठाकरे, प्रवीण जनबंधू,निखिल वदनलवार, पंकज काकडे , पंकज धवणे, श्याम इडपवार,शरद कुलसंगे, अजय बुरीले, संदेश ससाने, गीतेश योगेश रडके, प्रीतम कुमरे ,अमोल तडस, अक्षय भगत, नितीन उघडे,लाला जयस्वाल, इकराम आली, विकी गिरडे, अरबाज शेख राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल त्रिपाठी, राहुल कोळसे,नयन निखाडे ,युवराज माऊस्कर, पवन काकडे, रितू मोघे, शुभम पिसे ,गोलू डफ, हर्षल तपासे, नयन पणत ,दिपांशू ढेंगळे, शाहरुख बक्ष, राहुल बावणे,अभिषेक आंबटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाजिर अली,रवी बुरीले, दिवाकर डफ, पृथ्वीराज दौलतकर, चोखाराम डफ,मधुकर कुटे, भोजराज गुळघाणे, निरंजन भोंगाडे, गणपत भोंग, साहिल कडू ,फाईम खान ,अशोक मुसळे, आदर्श त्रिवेदी ,कपिल पुसदेकर ,विवेक ठलाल ,दीपक राईकवार नरेश पवार,नाना हेडाऊ, संजय भोयर, रोशन मोरे ,सौरभ भागवते,तीलक हिवंज,अभिषेक आंबटकर, धीरज साळवे, सुरज शर्मा, चेतन कडू, शुभम जुमनाके ,साफी अली शशिकांत तामगाडगे, अक्षय लोखंडे, शुभम लोखंडे, अर्जुन भोगे,अनिकेत फुलकर,तुषार तुमसरे, अक्षय ब्राह्मणे,दानिश शेख,प्रचिल वनकर, शंकर तांमठे, अजय बावणे,शोएब शेख, सरफराज शेख, रवींद्र बुरीले,रिंकू भालेराव,आदर्श तेल्हांडे, श्रीकृष्ण मेश्राम,संकेत हींगे, राहुल मुंजे, अभिषेक राऊत,ऋतिक कडू, गोलू ठोंबरे,कुणाल कांबळे, समवेक फुलकर, सुशांत भगत, पवन भगत,अंकित कांबळे,शुभम नक्षीने, आकाश गलांडे धनंजय तराटे, गणेश गलांडे,विलास चांदनखेडे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने युवक सहभागी होते.