आकाश उर्फ शंकर धुळे यांचा भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार

🔸गुजरात येथे झालेल्या नॅशनल यूथ गेम स्पर्धत पुसद येथील आकाश धूळे राज्यातुन प्रथम आल्याबद्दल भीम शक्ति सामाजिक संघटनेच्या वतिने जाहीर सत्कार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद( दि.28जुलै):-पुसदचा मिल्का सिंग अशी ओळख असलेला विदर्भ चॅम्पियन आकाश उर्फ शंकर धूळे यांनी नुकतेच गुजरात येथे झालेल्या नॅशनल यूथ गेम स्पर्धेत १० कि.मी.धावण्याच्या स्पर्धेत राज्यातुन प्रथम तर देशातुन तिसरा क्रमांक पटकवल्यामुळे त्यांचा भीमशक्ति सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरज हाडसे यांच्या पुढाकाराने पुष्पगुच्छ, शाल ,श्रीफल, देवुन जाहिर सत्कार करण्यात आला .

आकाश धूळे यांनी अतिशय गरिब परिस्थितिवर मात करुन हे यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याचे राहते घरी जाऊन भव्यदिव्य सत्कार करून पुढील वाटचालीसाठी सर्वपरि मदत करण्याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी रमाई उद्योजक विट्ठलराव खडसे , पांडुरंग व्यव्हारे बिरसा मुंडा बिग्रेडचे अध्यक्ष, शितलकुमार वानखेडे , अनिल हाट्टेकर , संजय धांडे , अॅड. पि, एन विघ्ने, सुरज कुरील नेता मोची समाज,भारतीय बौध्द महासभा शहराध्यक्ष ल.पु कांबळे , सुभाष गायकवाड़ , अरविंद थोरात,गणेश कांबळे, आकाश सावळे, प्रफुल्ल भालेराव, ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्ति संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरज हाडसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष अंभोरे शहराध्यक्ष भीमशक्ति संघटना पुसद यांनी केले.
महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED