शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांचा “इन -आऊट ” खेळ…!

30

🔹स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्हा उत्पादन शुल्क विभाग सुस्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29जुलै):-1एप्रिल 2015 ला चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या दारूबंदी ने परवानाधारक दारू विक्रेते जिल्ह्यात हताश बघायला मिळाले तर अवैध दारू विक्रेत्यांची जिल्ह्यात सर्वत्र “चांदी” बघायला मिळत होती मात्र महाविकास आघाडी सरकार ने जिल्ह्यातील दारू बंदी उठवताच परवानाधारक दारूविक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला तर अवैध दारू विक्रेते हताश झाले मात्र शहरातील परवानाधारक दारू विक्रेते अवैध दारू विक्रेत्यांच्या मदतीला धावून येत त्यांना स्टॉक पुरवठा करत असून ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रीला चालना देत, दणदणीत माल सेलिंग चा फंडा वापरात असल्याने शहरातील वातावरण दारूमय झाल्याचे बघायला मिळत आहे.

लॉकडाऊन दरम्यान ईतर व्यवसाईकांना शासनातर्फे वेळेचे कडक निर्बंध असतांना शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांना कुठलेही निर्बंध नसल्यागत सराईत पणे वेळी-अवेळी दारू विक्री करण्याची मुभा मिळाल्यागत, दारू दुकान लगत खुलेआम दारू विक्री होतं असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.

दारूबंदी असतांना जोमात असलेली पोलीस कारवाई दारूबंदी उठता क्षणी सुस्तावल्या गत झाल्याने परवानाधारक दारू विक्रेते मस्तवाल झाले असून त्यांना “मोकळीक” देण्याचे काम प्रशासनातील काही लाचखोर अधिकारी, कर्मचारी करत असल्याच्या चर्चेला शहरात उधाण असून शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांच्या “इन-आऊट” खेळाला स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्हा उत्पादन शुल्क विभाग विराम देणार का…? हे पाहणे आता उल्लेखनीय.